'शिवसेनेने युतीची अपेक्षा सोडली'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

मुंबई - शिवसेना- भाजपमधील युतीची आतापर्यंतची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर शिवसेने युतीची अपेक्षा सोडली असल्याचे संकेत रविवारी (ता. 22) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. "जागावाटपाचा प्रस्ताव अद्याप माझ्यापर्यंत आलेला नाही. आशा- निराशेचा खेळ खेळण्याची आता वेळही नाही,' असे सांगत ठाकरे यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. 

शिवसेनेने भाजपला 60 जागांचा प्रस्ताव दिल्यानंतर भाजपने या संदर्भात भूमिका स्पष्ट करताना सांगितले, की युतीसंदर्भात श्रेष्ठीच चर्चा करतील. शिवसेनेच्या या प्रस्तावानंतर युती फिसकटण्याची शक्‍यता असतानाच ठाकरे यांनीही तसेच संकेत दिले. मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी युतीवर स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला असला, तरी शिवसेना युतीच्या अपेक्षेवर राहिलेली नसल्याचे सूचित केले. 

ठाकरे म्हणाले, ""युतीची चर्चा अजून सुरू आहे. पक्षश्रेष्ठींना प्रस्ताव देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अद्याप माझ्यापर्यंत कोणताही प्रस्ताव आलेला नाही. भाजपकडूनही माझ्याकडे कोणताच प्रस्ताव आलेला नाही, तो आल्यावर पक्षश्रेष्ठी एकमेकांशी बोलतील आणि निर्णय जाहीर करू.'' 

तुम्ही युतीच्या आशेवर आहात का, असा प्रश्‍न विचारला असता ठाकरे यांनी, "आशा- निराशांचा खेळ खेळण्याची आता वेळ राहिलेली नाही,' असे सांगत त्यांनी भाजपला इशाराही दिला. 

ठाणे पॅटर्न राज्यभर 
मुंबईकरांना मालमत्ताकराची सवलत देण्याची घोषणा ताजी असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ठाणेकर आणि उल्हासनगरवासीयांवर मालमत्ताकर सवलतीसह इतर घोषणांचा पाऊस पाडत ठाण्यात कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला शह दिला, तर भारतीय जनता पक्षाला कात्रजचा घाट दाखवला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. हाच धोबीपछाड पॅटर्न अन्य आठ महापालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत ते राबविणार असल्याचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. 

Web Title: Shiv Sena alliance should leave