Shiv Sena: हॉटेल वेस्टिनमध्ये उद्या साजरा होणार शिवसेनेचा वर्धापनदिन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray_Shiv Sena
Shiv Sena: हॉटेल वेस्टिनमध्ये उद्या साजरा होणार शिवसेनेचा वर्धापनदिन!

Shiv Sena: हॉटेल वेस्टिनमध्ये उद्या साजरा होणार शिवसेनेचा वर्धापनदिन!

मुंबई : राज्यात एकीकडे शिवसेनेसह सर्वच प्रमुख पक्ष विधानपरिषद निवडणुकीची रणनिती आखण्यात व्यस्त आहेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी आपापल्या आमदारांना वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये सध्या वास्तव्याला ठेवलं आहे. दरम्यान, उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, हा सोहळा वेस्टिन हॉटेलमध्ये जिथं शिवसेना आमदार आहेत तिथचं साजरा होणार आहे. (Shiv Sena anniversary to be celebrated tomorrow at Hotel Westin with MLA only)

हेही वाचा: राज्यात आजपासून वाढणार पावसाचा जोर; 'या' भागात अतिमुसळधारेचा इशारा

शिवसेनेच्या आमदारांचा सध्या हॉटेल वेस्टिनमध्ये मुक्काम असून याच ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या दुपारी १२ वाजता आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. वर्धापन दिन आणि विधानपरिषद निवडणूक या पार्श्वभूमीवर आमदारांना मार्गदर्शन करणं हे शिवसेनेसाठी गरजेचं असणार आहे. दरम्यान, कार्यक्रमात ठाकरे आमदारांना कोणता कानमंत्र देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतून फारुख अब्दुल्लांचीही माघार

दरम्यान, शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी शिवसेनेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आणि उद्धव ठाकरेंचं संबोधन हे ऑनलाईन स्वरुपात पाहता येणार आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेहमी षणमुखानंद सभागृहात पार पडणारा हा वर्धापन दिनाचा सोहळा कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळं होणार नाही. तर तो आता हॉटेल ड्रायडंटमध्येच साजरा होईल.

Web Title: Shiv Sena Anniversary To Be Celebrated Tomorrow At Hotel Westin With Mla Only

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top