महापौर बंगल्यात आवराआवर सुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी दादरमधील शिवाजी पार्क येथील महापौर बंगला रिकामा केला जात आहे. त्यासाठी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी गुरुवारी (ता. १७) आवराआवर सुरू केली. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील निवासस्थानी ते पुढील आठवड्यात स्थलांतर करणार असल्याचे समजते. 

शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तब्बल ४० वर्षे दसरा मेळावे घेतले. मुंबई महापालिकेत २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. यामुळे मुंबईचे महापौरपद पाव शतकापासून शिवसेनेकडेच आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी महापौर बंगल्याला अनेकदा भेट दिली होती. म्हणून त्यांचे स्मारक उभारण्यासाठी ही जागा स्मारक ट्रस्टकडे हस्तांतरित झाली आहे. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून २३ जानेवारीला स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महापौर महाडेश्‍वर यांनी आवराआवर सुरू केली आहे. तेथील सामान राणीच्या बागेतील बंगल्यात हलवण्याचे काम गुरुवारी सुरू झाले.  

महापौरांसाठी पर्यायी निवासस्थान म्हणून राणीच्या बागेतील बंगला निश्‍चित करण्यात आला आहे. या बंगल्याला महापौरांनी १५ डिसेंबरला सहकुटुंब भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी बंगल्यात काही सुधारणा सुचवल्या होत्या. या सुधारणा करून बंगला १५ दिवसांत तयार ठेवा, असे आदेश महाडेश्‍वर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिला होता. त्यानुसार रंगरंगोटी आणि सुधारणा करून बंगला तयार झाला आहे. महापौर आपल्या कुटुंबासह आठवडाभरात नव्या घरात राहण्यासाठी जातील, असे सांगण्यात आले.

Web Title: For the Shiv Sena Balasaheb Thackeray memorial the mayor of Shivaji Park in Dadar is being vacated