शिवसेना-भाजपच्या श्रेयाच्या लढाईत दोनदा भूमिपूजन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

मुंबई - विकासकामांच्या श्रेयावरून आता शिवसेना-भाजपमध्ये जुंपू लागली आहे. बोरिवलीतील शताब्दी रुग्णालयाच्या प्रस्तावित इमारतीच्या भूमिपूजनावरून मंगळवारी (ता. 3) चांगलेच श्रेय युद्ध रंगले. भाजपने भूमिपूजनाचे फलक झळकावल्यानंतर सकाळी शिवसेनेने घाई-गडबडीत भूमिपूजन उरकून घेतले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे भाजपनेही भूमिपूजन पार पाडले. 

शताब्दी रुग्णालयाचे नामकरण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले करणे आणि प्रस्तावित इमारतीचे भूमिपूजन करणे असे कार्यक्रम मंगळवारी भाजपने आखले होते. तसे फलकही लावण्यात आले होते; मात्र त्या कार्यक्रमांपासून शिवसेनेला लांब ठेवण्यात आले. हा प्रकार लक्षात येताच शिवसेनेनेही घाई-गडबडीत भूमिपूजन आणि नामकरणाचा कार्यक्रम उरकून घेतला. शिवसेनेच्या भूमिपूजनानंतर भाजपने ठरल्याप्रमाणे आपला कार्यक्रम पार पाडला. दहिसर-बोरिवली परिसरात शिवसेना-भाजपमध्ये काही महिन्यांपासून श्रेय युद्ध पेटलेले आहे. तरण तलाव आणि भगवती रुग्णालयाचे उद्‌घाटन करण्यावरूनही शिवसेना-भाजपमध्ये वाद झाला होता. कामात चुका वा त्रुटी राहिल्यानंतर शिवसेनेला जबाबदार धरले जाते. भाजपवाले फक्त श्रेय घ्यायला येतात, असा टोला शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी लगावला. 

भाजपच्या नगरसेविका दोन्ही ठिकाणी 
भाजपच्या नगरसेविका आसावरी पाटील यांनी भूमिपूजन कार्यक्रमाचे फलक झळकावले होते. शिवसेनेने भाजपच्या अगोदरच भूमिपूजन सुरू केल्यावर त्या तिथे उपस्थित राहिल्या. नंतर भाजपने केलेल्या भूमिपूजनाच्या वेळीही त्या त्यात सहभागी झाल्या होत्या. मी रुग्णालयाचा प्रस्ताव मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे स्वत: पक्षाच्या आमदार आणि खासदारांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचा निर्णय घेतला होता, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.

Web Title: Shiv Sena-BJP battle twice foundation stone