शिवसेना-भाजपमध्येच मैत्रीपूर्ण लढतीची खेळी 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

मुंबई - महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-कॉंग्रेस यांच्यात नव्हे; तर शिवसेना-भाजपमध्येच मैत्रीपूर्ण लढत होत आहे. हे दोन्ही पक्ष मुंबईतील नागरिकांच्या डोळ्यांत धूळफेक करीत आहेत, अशी टीका मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. 
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये "मॅच फिक्‍सिंग' झाल्याचा आरोप भाजपने केला होता. हा आरोप म्हणजे मोठा विनोद आहे, असे निरुपम म्हणाले.

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये "मॅच फिक्‍सिंग' असल्याचा आरोप रविवारी (ता. 5) एका सभेत केला होता. शिवसेने पाठोपाठ कॉंग्रेसनेही हा आरोप फेटाळला आहे. निरुपम म्हणाले की, शिवसेना आणि भाजप या दोघांची महापालिकेत युती असताना मुंबईवासीयांच्या सोयीसुविधांसाठी त्यांनी काहीच कामे केली नाहीत. त्यामुळे आता नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी भाजप आमच्यावर खोटे आरोप करत आहे. कोणत्या वॉर्डात, कोणत्या जागांबाबत "मॅच फिक्‍सिंग' झाले आहे, हे त्यांनी सांगावे. यावर खुली चर्चा करायला आम्ही तयार आहोत, असे आव्हानही निरुपम यांनी भाजपला दिले. 

Web Title: shiv sena bjp bmc election