खासगी रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री येत असल्याने नाराजी

hospital
hospital

विक्रोळी : विक्रोळीत महात्मा फुले या पालिका रुग्णायलाची दुरवस्था असताना,शुश्रूषा या खासगी रुग्णालयाच्या उदघाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी ता. (14) येत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेस, मनसे, मार्क्सवादी कम्युनिस्ट, भारिप बहुजन महासंघ या पक्षांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी याचा याचा तीव्र निषेध केला आहे. तर शिवसेनेने या कार्यक्रमावरच बहिष्कार टाकला आहे. शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी याबाबतची भूमिका सकाळकडे व्यक्त केली. फेसबुकवरही मुख्यमंत्री या कार्यक्रमाला येत असल्याबाबत टीका करण्यात येत आहे. उद्घाटनावर स्थानिकांनी बहिष्कार टाकावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

मुख्य म्हणजे उदघाटनाचा कार्यक्रम पालिका रुग्णालयाच्या अगदी बाजूला असणाऱ्या विकास हायस्कुलमध्ये होत आहे. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी धनिकांच्या रुग्णालयात न ज जाता पालिका रुग्णालयात भेट द्यावी, अशी खरमरीत टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जॉय झेविअर यांनी केली आहे. 

विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप, नाहूर येथे मोठया प्रमाणावर श्रमिक आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय नागरिक राहतात. तसेच पूर्व द्रुतगती मार्गावर अपघातांची संख्याही मोठी आहे. परंतु, त्या तुलनेत महात्मा फुले रुग्णालय वैद्यकीय सुविधा देण्यास अपुरे पडत आहे. या ठिकाणी वेळेवर वैधकिय मदत मिळत नाही. रुग्ण आल्यास शीव येथील टिळक रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. सुपरस्पेशालिटी रुग्णालय बनेल, इतकी जागा फुले रुग्णालयाच्या परिसरात आहे. तीन वर्षात शुश्रूषा रुग्णालय बनते, पंरतु, याच दरम्यान फुले रुग्णालयाची दुरवस्था होत गेली. अनेक विभाग बंद पडले. या ठिकाणी अद्ययावत शुश्रूषा रुग्णालय बनत असताना, फुले रुग्णालयाकडे पालिका प्रशासनाने मात्र दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.

फेसबुकच्या पोस्टला उत्स्फूर्त प्रतिसाद
शासकीय रुग्णालयाची दुर्दशा झाली असताना खासगी रुग्णालयाच्या उदघाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री येणार आहेत, Likes नको Comment's करा. अशी पोस्ट भारिप बहुजन महासंघाचे चेतन अहिरे यांनी फेसबुकवर टाकली आहे. त्यावर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.

हे भांडवलंदारांचे सरकार आहे. यांना सर्वसामान्यांचे काही पडलेलं नाही आहे. विक्रोळी विभागातील फुले रुग्णालय बंद करायचं आहे. फुले रुग्णालयाचे पुढे काय होणार? हे समजत नाही. कॉंग्रेस हे सर्वसामान्य बरोबर उभी राहील असे काँग्रेसचे ...... प्रणील नायर म्हणाले आहेत.

काही तरी साटेलोट असावं. आज अनेक वर्ष झाली विक्रोळीत सुपरस्पेशिलीटी रुग्णालय बनणार असे सांगण्यात येते. बनत तर काही नाही. खासगी रुग्णालय बनलं आहे. येथे राहणारा कष्टकरी वर्ग आहे. त्यांना हे रुग्णालय परवडणारे नाही. त्यामुळे पालिकेच्या सुसज्ज रुग्णालयासाठी मुख्यमत्र्यांनी जोर लावला पाहिजे, असे मनसेचे शाखाध्यक्ष जयंत दांडेकर म्हणाले.

मी अनेक वर्षापासून पालिका रुग्णालया सुसज्ज व्हावे यासाठी पाठपुरावा करत आहे. पण रुग्णालयाचे काही होत नाही. स्थानिक नेते सांगतात, नवीन रुग्णालय होणार पण कधी ते सांगत नाहीत. आज त्याच्या पाठून खासगी रुग्णालय तयार झाले याचा अर्थ धनशक्ती असेल तर सर्व काही होवू सकते.  मुख्यमंत्री येत आहेत पण सर्व सामान्य माणसांच्या पालिका रुग्णालयाचे काय ? असा प्रश्न ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते   ज्ञानदेव ससाणे यांनी उपस्थित केला आहे.

शिवसेनेचा बहिष्कार : राऊत
मी आणि स्थानिक नगरसेवक उपेंद्र सांवत यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. कारण या रुग्णालयाने स्थानिक मुलांना नोकऱ्या दिल्या नाहीत. तसेच जुन्या कामगारांना दादर येथील रुग्णालयात पाठवत आहेत. काही डॉक्टर आपल्या मर्जीतील लोकांना नोकरी देत आहेत. हे चुकीचं आहे. तसेच महात्मा फुले रुग्णालय हे सुपर स्पेशालिटी बनण्यासाठी पाठ पुरावा सुरू आहे, असे आमदार सुनील राऊत म्हणाले. पालिकेचे रुग्णालय व्यवस्थित व्हावे, येथे उत्तरं दर्जाची सेवा मिळावी, नागरिकांना वैद्यकीय सेवा मोफत आणि अति अल्प दरातच मिळायला हवी, त्यासाठी पालिका रुग्णालय टिकणे गरजेचे आहे. पालिका रुग्णालय दुरवस्थेबाबत आम्ही मुख्यमंत्री यांना विनंतीपत्र देऊ, असे भारीपचे चेतन अहिरे म्हणाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com