"शिवसेना-भाजपने मुंबईला विकासापासून वंचित ठेवले' 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

मुंबई - सलग 20 वर्षे मुंबई महापालिकेच्या सत्तेवर असूनसुद्धा शिवसेना-भाजप आजपर्यंत मुंबईकरांसाठी मूलभूत सोयीसुविधा देऊ शकले नाहीत. चांगल्या दळणवळणाच्या सुविधा देऊ शकले नाहीत, अशी टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली. मुंबईमध्ये अंधेरी येथील रहेजा क्‍लबमध्ये एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. 

मुंबई - सलग 20 वर्षे मुंबई महापालिकेच्या सत्तेवर असूनसुद्धा शिवसेना-भाजप आजपर्यंत मुंबईकरांसाठी मूलभूत सोयीसुविधा देऊ शकले नाहीत. चांगल्या दळणवळणाच्या सुविधा देऊ शकले नाहीत, अशी टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली. मुंबईमध्ये अंधेरी येथील रहेजा क्‍लबमध्ये एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. 

चिदंबरम म्हणाले, की मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबई हे देशाला सर्वांत जास्त महसूल मिळवून देणाऱ्या शहरांपैकी एक शहर आहे आणि या शहरामध्ये चांगले रस्ते नाहीत, रेल्वेची चांगली सुविधा नाही, मूलभूत सुविधा ज्या महापालिकेकडून-सरकारकडून सामान्य जनतेला मिळायला हव्यात, त्या मिळत नाहीत. मला कधी-कधी प्रश्‍न पडतो, की जो देश अंतराळात यान पाठवतो, इतके प्रगत तंत्रज्ञान ज्या देशात आहे, अशा देशातील मुंबईसारख्या आर्थिक राजधानी असलेल्या शहरामध्ये उच्च दर्जाची रेल्वे व्यवस्था लोकांना का मिळत नाहीत? जेव्हा कॉंग्रेसचे सरकार सत्तेत होते, तेव्हा कॉंग्रेस मुंबईला जागतिक दर्जाचे विमानतळ, मेट्रो, मोनोरेल, बांद्रा-वरळी सागरी सेतू, ईस्टर्न फ्री वे अशा दळणवळणाच्या सुविधा दिल्या; पण आताच्या घडीला मुंबईचा स्तर इतर शहरांच्या तुलनेत घसरत चालला आहे. त्यामुळे अशा लोकांना महापालिकेची सत्ता देण्यापेक्षा मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कॉंग्रेसला मतदान करा आणि आपल्या मताचा सदुपयोग करा. 

नोटाबंदीवरून टीका 
पी. चिदंबरम यांनी बांद्रा येथे महाविद्यालयीन विद्यार्थी, युवकांशी अनौपचारिक संवाद साधला. नोटाबंदीसंदर्भात त्यांनी भूमिका मांडताना हा निर्णय चांगला असला, तरी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे तसेच नियोजनशून्य धोरणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याचे सांगितले. युवकांच्या सर्व प्रश्‍नांना दिलखुलास उत्तरे देताना त्यांनी नोटाबंदीच्या समर्थनार्थ मांडलेल्या बाजूची दुसरी बाजूही समजावून सांगितली आणि युवकांचे शंकानिरसन केले.

Web Title: Shiv Sena-BJP deprived of development