BMC च्या स्थायी समितीच्या बैठकीवरून शिवसेनेची कोंडी; भाजप आक्रमक

BMC च्या स्थायी समितीच्या बैठकीवरून शिवसेनेची कोंडी; भाजप आक्रमक

मुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकी वरुन शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे. भाजपचे स्विकृत नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने पुढील सुनावणी पर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता गुरुवारी ( ता.29) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेने स्विकृत नगरसेवक म्हणून शिरसाट यांचे स्थायी समितीचे सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव स्थायी समितीच्या बैठकित बहूमताने मंजूर केला.या निर्णयाला शिरसाट यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले.उच्च न्यायालयात 23 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत शिरसाट यांच्या सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय राखून ठेवला होता. त्याच दिवशी महापालिकेच्या महासभेत यापुढे स्थायी, सुधार, शिक्षण आणि बेस्ट समितीत स्विकृत नगरसेवकांना सदस्यत्व देऊ नये असा ठराव केला आहे. असेे असले तरी 23 ऑक्टोबर रोजीच न्यायालयाने शिरसाट यांच्या सदस्यत्वा बाबत स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिलेली असल्याने 26 ऑक्टोबर रोजी होणारी बैठक पुढे ढकलून 29 ऑक्टोबर रोजी घेण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला.

शिरसाट यांच्या सदस्यत्वा बाबत आज न्यायालयात सुनावणी झाली असून सदस्यात्वाचा निर्णय 5 नोव्हेबर पर्यंत राखून ठेवला आहे. त्यामुळे आता 29 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकित शिरसाट उपस्थित राहू शकतील. या बैठकीत 600 हून अधिक प्रस्ताव चर्चेला येणार आहेत. त्यामुळे भाजप आता अधिक आक्रमक पणे मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

न्यायलयात काय झाले 

भालचंद्र शिरसाट यांनी केलेल्या उच्च न्यायालयात केलेल्या  याचिकेवर  5 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत त्यांचे समिती सदस्यत्वाच्या निर्णयावर अमंलबजावणी न करण्याचा अंतरिम आदेश कायम आहे. तसेच याचिकेत नवीन मुद्दे नमूद करण्याची परवानगीही न्यायालयाने दिली आहे.

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com