शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचा आठवा स्मृतीदिन; शिवतीर्थावर गर्दी करु नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

पूजा विचारे
Tuesday, 17 November 2020

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतीदिन आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी दरवर्षी या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर जाऊन त्यांना अभिवादन करत असतात.

मुंबईः : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतीदिन आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी दरवर्षी या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर जाऊन त्यांना अभिवादन करत असतात. मात्र यावर्षी कोरोनाचं संकट असल्यानं शिवतीर्थावर गर्दी न करण्याचं आवाहन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. 

कोरोनाचे सावट असल्याने गर्दी करू नका, संयम पाळा, जेथे आहात तिथूनच शिवसेनाप्रमुखांना मानवंदना द्या, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसंच कोरोनाव्हायसरचा संसर्ग सुरु असल्याने अभिवादनासाठी येणाऱ्या सर्व शिवसैनिकांना मास्क वापरणं आणि सोशल डिन्स्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सकाळी 11.30 वाजता सहकुटुंब छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी दाखल होतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साडेअकराच्या सुमारास शिवतीर्थावर येऊन आदरांजली वाहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी शिवसेना नेते आणि मंत्रीही उपस्थित राहाणार आहेत. 

17 नोव्हेंबर 2012 रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. मातोश्री या निवासस्थानी त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

अधिक वाचा-  फटाके फोडण्यावरून झालेल्या वादात वयोवृद्धांसह दोघांवर प्राणघातक हल्ला

Shiv Sena founder Balasaheb Thackeray Memorial death anniversary today


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena founder Balasaheb Thackeray Memorial death anniversary today