Modi Cabinet : शिवसेनेच्या वाट्याला पुन्हा 'अवजड' खाते! पुन्हा अपेक्षाभंग! 

Arvind Sawant
Arvind Sawant

मुंबई : शिवसेना आणि भाजपच्या युतीमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये झालेल्या कुरबुरी पाहता, नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये चांगले खाते मिळण्याची शिवसेनेला आशा होती. पण पुन्हा एकदा त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. शिवसेनेच्या वाट्याला एकच मंत्रीपद आले आणि त्यातही अवजड उद्योग खातेच देण्यात आले आहे. 

पाच वर्षांपूर्वीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी सरकार स्पष्ट बहुमतासह सत्तेत दाखल झाले. त्याहीवेळी मंत्रिमंडळामध्ये भाजपच्याच मंत्र्यांना वजनदार खाती मिळाली होती. त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप-शिवसेनेने युती मोडत स्वतंत्र निवडणूक लढविली. निवडणुकीनंतर दोन्ही पक्ष एकत्र आले, तरीही राज्यातही त्यांना फारशी वजनदार खाती मिळालेली नाहीत. त्या पार्श्‍वभूमीवर यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच दोन्ही पक्षांनी मतभेद बाजूला सारत पुन्हा युती केली. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजप-सेना युतीने पुन्हा एकदा दणदणीत कामगिरी केली. त्यामुळे यंदा तरी शिवसेनेला चांगले खाते मिळणार का, अशी उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये होती. शिवसेनेला एकच मंत्रीपद मिळणार, हे स्पष्ट झाल्यानंतर त्या मंत्रीपदासाठीही पक्षातील खासदारांमध्ये चुरस होती. अखेर उद्धव ठाकरे यांनी अरविंद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मंत्रिमंडळातील खातेवाटप आज (शुक्रवार) दुपारी जाहीर झाले. त्यामध्ये सावंत यांच्या वाट्यास अवजड उद्योग खाते देण्यात आले. यामुळे राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा दोन्ही पक्षांमध्ये कुरबुरी वाढू शकतील आणि पुढील मंत्रिमंडळ विस्तारामध्ये खातेवाटप बदलण्याची शक्यता आहे.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेनेने भाजपकडून मागून घेतला. इथे त्यांच्याकडे दुसरा उमेदवार नसल्याने शिवसेनेने सावंत यांना निवडणूक लढविण्याचा आदेश दिला. या मतदारसंघात सावंत यांनी मिलिंद देवरा यांचा पराभव केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com