भाजपच्या सीप्लेनला शिवसेनेचा ब्रेक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

मुंबई : गिरगाव येथील बिर्ला क्रीडा भवनात रंगभूमी दालन उभारण्याची घोषणा करून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या सीप्लेन योजनेला ब्रेक लावला आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावरून ठाकरे यांनी भाजपला ही मात दिली आहे. 

मुंबई : गिरगाव येथील बिर्ला क्रीडा भवनात रंगभूमी दालन उभारण्याची घोषणा करून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या सीप्लेन योजनेला ब्रेक लावला आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावरून ठाकरे यांनी भाजपला ही मात दिली आहे. 

ही घोषणा ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. 15) नाट्य संमेलनाच्या समारोप समारंभात केली. यातून त्यांनी भाजपला जोरदार धक्का दिला. गिरगाव चौपाटीवर सीप्लेनसाठी जेट्टी उभारण्यासाठी राज्य सरकारला बिर्ला क्रीडा भवनाचा भूखंड हवा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ड्रीम प्रोजेक्‍ट असलेल्या सीप्लेनसाठी जमीन न देता रंगभूमी दालन उभारण्याची घोषणा करून शिवसेनेने भाजपची कोंडी केली आहे. भाजपने आता शिवसेनेचा विरोध झुगारून हा भूखंड ताब्यात घेतल्यास मराठी अस्मितेचा मुद्दा शिवसेनेकडून पुढे आणला जाण्याची शक्‍यता आहे. 

लहान शहरांना जोडण्यासाठी मोदी यांनी सीप्लेनची संकल्पना मांडली. त्याचाच भाग म्हणून मुंबईला राज्यातील, तसेच परराज्यातील लहान शहरांना जोडण्यासाठी गिरगाव चौपाटीवर सीप्लेन उतरण्याची सोय करण्यात येणार होती. त्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने महापालिकेकडे हा भूखंड मागितला होता; मात्र सुधार समितीच्या बैठकीत शिवसेनेने हा प्रस्ताव हाणून पाडला होता. 

भाजपची पंचाईत 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष अधिकारांचा वापर करून चौपाटीवरील बिर्ला क्रीडा केंद्राचा भूखंड सीप्लेनसाठी हस्तांतरित करू शकत होते; मात्र उद्धव ठाकरे यांनी जाहीर व्यासपीठावर रंगभूमी दालन उभारण्याची घोषणा केल्यामुळे भाजपची पंचाईत झाली आहे. 

Web Title: Shiv Sena give break seaplan of BJP's