शिवसेनेचे पुन्हा ‘मी मुंबईकर’?

शिवसेनेचे पुन्हा ‘मी मुंबईकर’?

मुंबई - मुंबईबाहेरील रुग्णांवर महापालिका रुग्णालयांत उपचारांसाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून अनुदान घ्यावे, अशी ठरावाची सूचना शिवसेनेने महासभेत मांडली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने अप्रत्यक्षपणे ‘मी मुंबईकर’ घोषणा दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयांत येणारे ३० ते ४० टक्के रुग्ण शहराबाहेरील असतात. महापालिकेची आरोग्य सेवा प्रामुख्याने मुंबईतील करदात्याच्या पैशांवर चालते. या सेवेवर पहिला अधिकार मुंबईतील नागरिकांचा आहे. उपचाराच्या अत्याधुनिक सोईसुविधांमुळे महापालिकेच्या रुग्णालयांत देशभरातील रुग्ण येतात. जकात बंद झाल्यामुळे महापालिकेला आरोग्यसेवेसाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून अनुदान मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी ठरावाची सूचना शिवसेनेच्या राजुल पटेल यांनी मांडली आहे. या ठरावाच्या सूचनेवर या महिन्याच्या महासभेत निर्णय होईल.

देशभरातून येणाऱ्या रुग्णांना आरोग्य सेवा देण्यात मुंबईकरांचा पैसा खर्च होत आहे. या खर्चापोटी सरकारकडून अनुदान मिळणे गरजेचे आहे, असे मत पटेल यांनी व्यक्त केले. मुंबईबाहेरून येणाऱ्या रुग्णांना आपल्या रुग्णालयांत स्थानिकांपेक्षा १० टक्के जादा दर आकारण्याचा निर्णय पालिकेने गेल्या वर्षी घेतला आहे. ‘हेल्थकार्ड’ पद्धत लागू झाल्यावर त्याची काटेकोर अंमलबजावणी होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com