शिवसेनेने संधी गमावली

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 22 जुलै 2018

मुंबई - केंद्र सरकारविरुद्धच्या अविश्‍वास ठरावादरम्यान गैरहजर राहून शिवसेनेने महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावना संसदेच्या पटलावर मांडण्याची संधी टाळली, असा सूर आळविण्यास विरोधी पक्षांनी सुरवात केली आहे. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने अखेरच्या क्षणापर्यंत अविश्‍वास ठरावाबाबतची भूमिका ताणली होती. 

मुंबई - केंद्र सरकारविरुद्धच्या अविश्‍वास ठरावादरम्यान गैरहजर राहून शिवसेनेने महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावना संसदेच्या पटलावर मांडण्याची संधी टाळली, असा सूर आळविण्यास विरोधी पक्षांनी सुरवात केली आहे. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने अखेरच्या क्षणापर्यंत अविश्‍वास ठरावाबाबतची भूमिका ताणली होती. 

शिवसेना-भाजप यांची युती कायम असून, केवळ राज्यातील जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे; तर दररोज भाजपविरोधात आगपाखड करणाऱ्या शिवसेनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात थेट भूमिका घेण्याची हिंमत नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसने लगावला आहे. 

राज्यात व केंद्रात भाजपसोबत शिवसेना सत्तेत आहे. दररोज शिवसेना सरकारच्या विरोधात रस्त्यावर भूमिका घेते; मात्र सत्तेची चव चाखत बसते, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टीका केली.

अविश्‍वास ठरावाच्या दरम्यान शिवसेनेने सभागृहात उपस्थित राहून महाराष्ट्रावर केंद्र सरकार करत असलेल्या अन्यायाबाबत बोलायला हवे होते. केंद्र सरकारने कोकणवर अन्याय करणारा नाणार प्रकल्प लादला आहे.

गुजरातला जोडणाऱ्या बुलेट ट्रेनचा प्रकल्प येत आहे. या दोन्ही प्रश्‍नांवर शिवसेनेने केंद्र सरकारविरोधात तीव्र संघर्ष सुरू केला आहे. मात्र, स्पष्टपणे भूमिका मांडण्याची संधी असताना गैरहजर राहणे ही शिवसेनेची पळपुटी भूमिका आहे. देशभरातील इतर प्रादेशिक पक्ष स्वत:च्या राज्याबाबत भूमिका मांडत असताना शिवसेना मात्र गैरहजर राहते, याचाच अर्थ मराठी माणूस व महाराष्ट्राबाबत शिवसेनेला काहीही देणेघेणे नाही. सत्तेसमोर शिवसेना लाचार आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांनी केली.

राहुल गांधींनी विश्‍वासार्हता गमावली - काँग्रेस 
अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल करारासंबंधी आरोप करताना फ्रान्सचे 
अध्यक्ष इमान्युएल मॅकरॉन यांच्याशी झालेली भेट आणि चर्चेचा संदर्भ जोडून जागतिक पातळीवर आपली विश्‍वासार्हता कमी केल्याचे मत केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अरुण जेटली यांनी व्यक्त केले. राहुल गांधी यांच्या या कृतीमुळे जगासमोर भारतीय नेत्याच्या प्रतिमेला मोठा धक्का बसल्याचे जेटली यांनी फेसबुकवरील आपल्या लेखात म्हटले आहे.

Web Title: Shiv Sena has lost the opportunity politics