ठाण्यात पुन्हा शिवसेनेचे नाणे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

शिवसेनेसमोर प्रचारात कडवे आव्हान उभे करणाऱ्या भाजपला आतापर्यंत आठ जागांवर आघाडी मिळाली आहे. 

ठाणे : शिवसेना आणि भाजपमधील चुरशीच्या लढतीमुळे लक्ष वेधले गेलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी संथपणे सुरू आहे. सुरवातीच्या टप्प्यात शिवसेनेने निकालामध्ये अपेक्षेप्रमाणे आघाडी घेतली आहे. दुपारी 12 पर्यंतच्या निकालांनुसार 36 जागांपैकी 15 जागांवर शिवसेना आघाडीवर आहे. 

दिवा पॅनेलमध्ये राष्ट्रवादीने दोन जागा जिंकल्या, तर एक जागा मनसेच्या पार्वत्री म्हात्रे यांनी जिंकली, तर प्रभाग क्रमांक 27 मधून शिवसेनेच्या चारही उमेदवारांनी बाजी मारली. या प्रभागात शिवसेनेच्या शैलेश पाटील, अंकिता पाटील, दिपाली भगत आणि अमर पाटील यांनी विजय मिळविला. 

शिवसेनेसमोर प्रचारात कडवे आव्हान उभे करणाऱ्या भाजपला आतापर्यंत आठ जागांवर आघाडी मिळाली आहे. 

Web Title: shiv sena lead in Thane municipal corporation