संजय राऊत मला उघडपणे धमकी देतायत, कंगना राणावतचं नवं ट्विट

पूजा विचारे
Thursday, 3 September 2020

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मला उघडपणे धमकी दिल्याचं कंगनानं म्हटलं आहे. तसंच राऊतांनी मुंबईला परत न येण्यासही धमकावलं आहे.

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिनं पुन्हा एकदा रोखठोक ट्विट केलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मला उघडपणे धमकी दिल्याचं कंगनानं म्हटलं आहे. तसंच राऊतांनी मुंबईला परत न येण्यासही सांगितलं आहे. 

कंगनानं एका वृत्तपत्राची बातमी रिट्विट केली आहे. यावर तिनं लिहिलं की, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मला उघडपणे धमकी दिली आहे. मुंबईच्या रस्त्यावर आझादीची ग्राफिटी आणि आता उघड्या धमक्या. पाकिस्ताननं काश्मिर काबीज केल्यासारखी मुंबई का वाटत आहे?

 

काही दिवसांपूर्वी मी हल्ली मूव्ही माफियांपेक्षाही मुंबई पोलिसांना घाबरायला लागले आहे. आता मला मुंबई पोलिसांकडून सुरक्षा नको. त्यापेक्षा हिमाचल प्रदेश सरकारने किंवा थेट केंद्रानेच मला सुरक्षा पुरवावी, असं ट्विट कंगनानं केलं होतं. त्यानंतर कंगनाच्या ट्विटवर संजय राऊत भलतेच भडकले होते. त्यांनी अशा व्यक्तींनी चंबूगबाळं आवरावं आणि आपल्या राज्यात चालतं व्हावं, असं वक्तव्य राऊत केलं होतं. 

अधिक वाचाः  राज ठाकरेंचा मोठ्या बंधुंना संतप्त सवाल, इतका आकस का?

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर अभिनेता कंगना राणावत नेहमी रोखठोक मत मांडत असते. मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय, असं कंगनानं मोठं विधान केलं होतं. भाजपचे आमदार राम कदम यांनी केलेल्या ट्विटवर तिनं ही भूमिका घेतली होती.  राम कदम यांनी कंगना राणावत बॉलिवूडमधील ड्रग्ज माफीयांचे कनेक्शन उघड करण्यास तयार आहे, त्यासाठी तिला महाराष्ट्र सरकारने सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. 

मोठी बातमीः कंगनाजी...राम कदमांवर टिप्पणी करत काँग्रेसनं कंगनाला दिला 'हा' सल्ला

मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय, असं उत्तर कंगनानं राम कदम यांच्या मागणीवर दिलं होतं. हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी, पण मुंबई पोलिस नको प्लिज, असं कंगना म्हणाली होती. कंगनानं तात्काळ राम कदम यांच्या ट्विटला रिप्लाय देत त्यांचे आभार मानले होते.

काँग्रेसचा कंगनाला सल्ला

मुंबई पोलिसांबद्दल व्यक्त केलेल्या भूमिकेनंतर काँग्रेसनं कंगनाला सल्ला दिला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट केलं.  कंगनाजी खरंतर तुम्ही ज्या व्यक्तीचे आभार मानले आहेत, त्याच्यापासूनच घाबरून राहायला हवं. मुलींसाठी ती फार धोकादायक आहे, असं सावंत यांनी म्हणत कदम यांच्यावर निशाणा साधला आहे.

Shiv Sena leader Sanjay Raut given me open threat kangana ranaut tweet


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena leader Sanjay Raut given me open threat kangana ranaut tweet