उद्यापर्यंत थांबा, मग बघा; शिवसेनेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

महाराष्ट्रात काय चाललंय हे आम्ही पाहत आहे. यावर शिवसेनेला हातावर हात ठेवून बसता येणार नाही. या प्रश्नावर सर्वांचे दरवाजे ठोठावून जर जनतेला न्याय मिळणार असेल तर त्यासाठी शिवसेनेची तयारी आहे.

मुंबई - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करणे हा राजकीय विषय नसून, सव्वाशे कोटी जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. देशात आर्थिक अराजकता निर्माण झाली आहे. उद्यापर्यंत थांबा निर्णय कळेल, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला. नागरिकांजवळील नोटा 30 डिसेंबरपर्यंत बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये बदलून मिळणार आहेत. या निर्णयामुळे देशभरात बँकांबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याविषयी संजय राऊत यांनी मत व्यक्त केले आहे.

संजय राऊत म्हणाले, की महाराष्ट्रात काय चाललंय हे आम्ही पाहत आहे. यावर शिवसेनेला हातावर हात ठेवून बसता येणार नाही. या प्रश्नावर सर्वांचे दरवाजे ठोठावून जर जनतेला न्याय मिळणार असेल तर त्यासाठी शिवसेनेची तयारी आहे. याबाबत उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली आहे. ममता बॅनर्जींसोबत उद्धवजींची चर्चा सुरु आहे. रोगापेक्षा औषध भयंकर हा प्रकार सध्या सुरू आहे. ही सत्ताधारी व विरोधी पक्षांची लढाई नाही, ही जनतेची लढाई आहे.

Web Title: Shiv Sena leader Sanjay Raut statement on note ban