गुजराती समाजातील नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील गुजराती समाजातील काही नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी करताना अन्य समाजांतील नेत्यांना शिवसेना आकर्षित करत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्यपातळीवरील प्रवक्ते हेमराज शहा, जयंती मोदी आणि भाजपचे गुजराती विभाग उपाध्यक्ष राजेश दोशी यांनी गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला.

महापालिका निवडणुकीआधीच शिवसेनेने आक्रमकपणे अन्य भाषक मतदारांत मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी मुळात भाजपची असलेली पारंपरिक गुजराती व्होट बॅंक आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न शिवसेना करत असल्याचे मानले जात आहे. शिवसेनेबद्दल अनेक वेळा जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले गेले. गुजराती समाजाने शिवसेनेसोबत आले पाहिजे, असे बाळासाहेब ठाकरे यांना नेहमी वाटत असे. आजपर्यंत गुजराती समाजाचा वापर केला गेला. सध्या रांगेत उभे राहणे हा राष्ट्रीय कार्यक्रम झाला आहे; पण शिवसेनेत मी तुम्हाला रांगेत उभे करणार नाही, असे उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.

तेजस ठाकरे यांची उपस्थिती लक्षवेधी
नेत्यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांचे दुसरे पुत्र तेजस यांची उपस्थिती अनेकांचे लक्ष वेधून घेत होती. 21 वर्षीय तेजस यांनी बुधवारी मुंबईतील शिवसेनेच्या काही शाखांना भेट दिली होती, त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या प्रचारात तेजस उतरणार, अशी चर्चा रंगली होती. याबाबत पत्रकारांनी विचारले असता उद्धव मिश्‍कीलपणे म्हणाले, की मी बरोबर काम करतो की नाही ते पाहण्यासाठी तेजस आला होता. तेजस, आदित्य नेहमी माझ्यासोबत असतात. तेजस सध्या महाविद्यालयात शिकतो आहे, त्यामुळे त्याचा राजकारणात येण्याचा कोणताही विचार नाही. सहजच वातावरण कसे आहे हे बघायला तो आला होता. राजकारणात यायचे असेल तेव्हा तो येईल; पण आता तरी तसा उद्देश नाही, असे उद्धव यांनी स्पष्ट केले.

Web Title: Shiv Sena leaders have access to the Gujarati community