'किंग मेकर' मनसेशिवाय मुंबईत सेनेचा महापौर

'किंग मेकर' मनसेशिवाय मुंबईत सेनेचा महापौर

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत जनतेने शिवसेना आणि भाजपला भरभरून मते देऊनही कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नाही. या दोन पक्षांमधील वादाचा फायदा घेत अवघ्या 7 जागांवर विजयी झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत महापौर बनविन्यासाठी आपली भूमिका 'किंग मेकर'ची ठरेल, असा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्षात भाजपने घेतलेल्या माघारीमुळे किंग मेकर मनसेचा फ्लॉप शो झाला. 

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत 84 जागांवर विजयी झालेल्या शिवसेनेपुढे 82 नगरसेवक निवडून आलेल्या भाजपने मोठे आव्हान उभे केले. त्यामुळे महापौरपदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता होती. पण इतर पक्षाचा पाठिंबा मिळविण्यात आणि नगरसेवक फोडण्यात अपयशी ठरलेल्या भाजपने शिवसेनेसमोर अखेर नांगी टाकली. आज (8 मार्च) झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या 82 आणि एक भाजप पुरस्कृत अशा एकूण 83 नगरसेवकांनी शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाड़ेश्वर यांना महापौरपदासाठी मत दिले. त्यामुळे शिवसेनेची 86 आणि भाजपचे 83 अशी एकूण 171 मते मिळवून महाडेश्वर महापौरपदावर विराजमान झाले. तसेच सेनेच्या हेमांगी वरळीकर यांचाही उपमहापौर बनण्याचा मार्ग सुकर झाला. 

या मतदान प्रक्रियेला मनसेचे सर्व नगरसेवक अनुपस्थित राहिले. एमआयएम पक्षाचाही एक नगरसेवक अनुपस्थित राहिला. मात्र, मनसेच्या गैरहजेरीनंतरही शिवसेनेला सहजपणे आपला महापौर निवडून आणता आला. यामुळे किंग मेकर बनण्याचे मनसेचे स्वप्न भंगले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com