मध्यावधी निवडणुकीची शिवसेनेची तयारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

शिवसेनेच्या या भूमिकेमुळे गुजरात विधानसभा निवडणुकीबरोबर राज्यातही मध्यावधी निवडणुका घ्याव्यात, असा भाजपमध्ये एक मतप्रवाह आहे.

मुंबई : राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्यास त्यासाठी पक्षाची जोरदार तयारी असायला हवी, तसेच विरोधकांसह सत्तेतील जोडीदार भाजपला शह देता यावा, म्हणून पक्षबांधणी करण्यासाठी मराठवाड्यात शिवसेनेने शिवसंपर्क अभियानास सुरवात केली असल्याचे मानले जाते. या अभियानाच्या माध्यमातून मराठवाड्यात आपला दबदबा कायम ठेवण्याचा शिवसेनेचा मानस आहे.

विरोधी पक्ष शेतकरी कर्जमाफी प्रश्नावर रान उठवत असताना शिवसेनेनेही सत्तेत राहून शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरला आहे. या मुद्यावर शिवसेना शेतकऱ्यांच्या बाजूने आसल्याचे चित्र निर्माण करत सरकारमधून बाहेर पडण्याची भाषा यापुढे करेल, याची कुणकुण भाजपला लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

शिवसेनेच्या या भूमिकेमुळे गुजरात विधानसभा निवडणुकीबरोबर राज्यातही मध्यावधी निवडणुका घ्याव्यात, असा भाजपमध्ये एक मतप्रवाह आहे. त्यामुळे भाजप पक्षबांधणी जोराने करू लगला आहे. याची जाणीव शिवसेनेलाही झाल्याने शिवसेनेने मराठवाड्यात संपर्क अभियान सुरू केल्याची चर्चा आहे. .

Web Title: shiv sena prepares for mid term elections