संजय राऊत कंगनाची माफी मागणार?, राऊतांनी केलं मोठं विधान

पूजा विचारे
Sunday, 6 September 2020

कंगनाला संजय राऊत यांनी हरामखोर मुलगी असं म्हटलं होतं. त्यानंतर या शब्दावरुन अनेकांनी आक्षेपही घेतला. राऊत यांनी अभिनेत्री माफी मागावी अशी मागणी आता होऊ लागली आहे.

मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत हिनं आतापर्यंत बरेच वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईची तुलना पाकिस्तान व्याप्त भागाशी केल्यानं हा वाद चांगलाच पेटला आहे. कंगनाच्या या वक्तव्यावर सर्वत्र तिच्यावर टीका केली जात आहे. शिवसेनेनं राज्यभरात तिच्याविरोध आंदोलन देखील केलं आहे. तिच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही जोरदार टीका केली आहे. कंगनाला संजय राऊत यांनी हरामखोर मुलगी असं म्हटलं होतं. त्यानंतर या शब्दावरुन अनेकांनी आक्षेपही घेतला. 

राऊत यांनी अभिनेत्री माफी मागावी अशी मागणी आता होऊ लागली आहे. मात्र जर कंगनानं महाराष्ट्राची माफी मागितली तर मी तिची माफी मागण्याबद्दल विचार करेन, असं राऊत म्हणालेत. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

 

तसंच मुंबईबद्दल वक्तव्य करण्याची हिंमत केली तशीच हिंमत कंगनानं अहमदाबद्दल करावी, असा टोलाही राऊत यांनी कंगनाला लगावला आहे. कंगनाने तिच्या एका ट्विटमध्ये मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. तिच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून अनेकांनी तिच्यावर टीका केली.  
 
हेही वाचाः  १२ सप्टेंबरपासून मुंबईतून सुटणार स्पेशल गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

मी अॅक्शनवाला माणूसः राऊत 

मी कोणाचंही नाव घेणार नाही.  मी पोकळ धमक्या देत नाही, मी शिवसैनिक आहे, अ‍ॅक्शनवाला माणूस, नौटंक्या करत नाही, या काही मेंटल केस मुंबईत वाढल्या आहेत, त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी कारवाई करावी, या शब्दात संजय राऊत यांनी कंगनावर निशाणा साधला आहे.

राम कदमांनी कंगनाची तुलना झाशीच्या राणीशी करणं हा सर्वात मोठा अपमान आहे. झाशीची राणी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता आहे.  झाशीची राणी ही महाराष्ट्राची वीरकन्या, महाराष्ट्राच्या अस्मितेवर ड्रग्सच्या गुळण्या करून आणि नशेच्या अंमलात कोणी स्वत:ला झाशीची राणी समजत असेल, आणि राजकीय पक्ष झाशीच्या राणीचा अपमान करणार असेल, तर राजकारण किती तळाला नेलंय हे स्पष्ट दिसतंय, असंही ते म्हणालेत.

अधिक वाचाः  NCBनं समन्स बजावल्यावर रियानं कोणाला दिली धमकी, वाचा सविस्तर

धमकी वगैरे देण्याची मला सवय नाही, आम्ही अ‍ॅक्शन घेतो, महाराष्ट्रात कमवते, खाते, मुंबई पोलिस त्यांचं रक्षण करते आणि त्यांच्यावरच आरोप कोणी करत असेल तर आम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही का?, असा सवालही संजय राऊत उपस्थित केला.

Shiv Sena Sanjay Raut Will apologizes if Kangana Ranaut apologising Maharashtra


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena Sanjay Raut Will apologizes if Kangana Ranaut apologising Maharashtra