संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांसाठी हटके ट्विट, वाढदिवसाच्या 'या' शब्दात दिल्या शुभेच्छा

पूजा विचारे
Monday, 27 July 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज ६० वा वाढदिवस आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यांना ट्विटरवरून एकदम हटके शुभेच्छा दिल्यात. संजय राऊत यांनी दिलेल्या या हटक्या शुभेच्छांची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज ६० वा वाढदिवस आहे. कोरोनाच्या संकटामुळं वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय. या वाढदिवसाच्या निमित्तानं शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यांना ट्विटरवरून एकदम हटके शुभेच्छा दिल्यात. संजय राऊत यांनी दिलेल्या या हटक्या शुभेच्छांची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

ट्विटरवर संजय राऊत यांनी लिहिलं की, ये दोस्ती...हम नही तोडेंगे...आपण आमच्या आयुष्यात खास आहात...आपणास वाढदिवसांच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!
देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे. या शब्दांत संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या असून सध्या या ट्विटची चर्चा सुरु आहे. 

अजित पवारांच्या शुभेच्छांची चर्चा

संजय राऊत यांच्याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. अजित पवारांनी शुभेच्छा देताना त्यांनी ट्वीट केलेल्या फोटोमुळं भलतीच चर्चा रंगली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख व महाविकास आघाडीचे नेते उद्धवजी यांना खूपखूप शुभेच्छा. आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो!, अशा शुभेच्छा अजितदादांनी दिल्यात. 

या शुभेच्छांसोबत त्यांनी एक फोटोही ट्वीट केलाय. हा फोटो चर्चेचा विषय ठरलाय.

अजित पवारांनी बारामतीच्या कृषी प्रदर्शनातील हा फोटो आहे. उद्धव ठाकरे आणि अजित पवार हे एका गाडीत बसून कृषी प्रदर्शन पाहत आहेत. गाडीचं स्टिअरिंग अजित पवारांच्या हातात आहे, असा तो फोटो आहे.

Shiv sena Sanjay raut wished cm uddhav thackeray on his 60th birthday


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv sena Sanjay raut wished cm uddhav thackeray on his 60th birthday