हेडगेवार स्वातंत्र्यसेनानी होते हे शिवसेनेनं जाणून घ्यावं - फडणवीस

fadnvis
fadnvis

शिवसेनेला इतिहास माहिती नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे स्वांतत्र्य सेनानी होते हे सेनेनं जाणून घ्यावं, अशा शब्दांत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना फडणवीस बोलत होते. 

मुख्यमंत्र्यांचे टोलेबाज भाषण; 'हा व्हायरस आहे, पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणतो'

फडणवीस म्हणाले, "स्वातंत्र्यवीर सावरकारांना देशद्रोही आणि समलैंगिक म्हणणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात. तुमचं सरकार तयार झाल्यानंतर काँग्रेसनं एक पुस्तक काढलं त्यात याचा उल्लेख करण्यात आला होता. अशा काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले मुख्यमंत्री आम्हाला हिंदुत्व सांगायला निघाले हे मोठं आश्चर्य आहे. संभाजीनगरबाबत तर त्यांनी खूपच हास्यास्पद वक्तव्य केलं आहे."

'आयुष्यात खोटं बोललो नाही, बोलणार नाही'; विधिमंडळात मुख्यमंत्री गरजले!

"शिवसेना कुठेही स्वातंत्र्य लढ्यात नव्हती हे मुख्यमंत्र्यांनी बरं झालं कबूल केलं. पण त्यांना हे माहिती नसेल की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे स्वातंत्र्य सेनानी होते. स्वातंत्र्यलढ्यात त्यांचं योगदान होतं याची माहिती त्यांनी घेतली नाही आणि इतिहासाची माहिती नसताना विनाकारण राजकीय भाषण त्यांनी केलं, असंही फडणवीस यावेळी म्हणाले. 

तुमच्या मातृसंस्थेचं स्वातंत्र्य लढ्यात योगदान नाही - मुख्यमंत्री

भाजपवर टीका करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले, शिवसेना कधीही स्वातंत्र्य लढ्यात नव्हती, पण तुमची मातृसंस्थाही कधी स्वातंत्र्य लढ्यात नव्हती. 'नुसतं भारत माता की जय' म्हणायचं याला काही अर्थ नाही. संघमुक्त भारत करणार असं म्हणणाऱ्या नितीश कुमार यांना तुम्ही डोक्यावर घेऊन नाचता. संघाला विरोध करणाऱ्या रामविलास पासवान यांनाही तुम्हाला सोबत घ्यावं लागलं, हे कसलं तुमचं हिंदुत्व.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com