AIIMS अहवालानंतर शिवसेना उड्या मारायला लागली; निलेश राणेंनी सेनेला पुन्हा डिवचले

तुषार सोनवणे
Monday, 5 October 2020

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी  एम्सच्या अहवालावर व्यक्त होणाऱ्या शिवसेना नेत्यांवर टीका करताना निलेश राणे यांनी ट्विट केले आहे.

मुंबई - सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात वेगवेगळे खुलासे होत असताना, एम्सने आपल्या अहवालात सुशांतचा मृत्यू आत्महत्येने झाला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अनेक शिवसेना नेत्यांनी याप्रकरणी शिवसेनेवर आरोप करणाऱ्यांवर टीका केली आहे. त्यावर निलेश राणे यांनी ट्विट केले आहे.

डबेवाल्यांच्या लोकलप्रवासासाठी रेल्वेकडून अद्यापही अध्यादेश नाही; क्यूआर कोडची प्रतिक्षा

सुशांतच्या मृत्यू नंतर त्याचा तपास मुंबई पोलिस करीत होती. या तपासावर अनेकांनी आक्षेप घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले.या चौकशीसाठी एम्सने याप्रकरणाचा अहवाल सादर केला आहे.त्यात त्यांनी सुशांतच्या शरिरात विषाचे अवशेष नाहीत. तसेच सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर मुंबई पोलिस आणि शिवसेनेच्या भूमिकेवर आरोप करणाऱ्यांवर शिवसेना नेत्यांनी टीकास्त्र सोडयला सुरूवात केली आहे. अनिल परब, प्रताप सरनाई, संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. या सर्वांवर निलेश राणे यांनी ट्विटवरून प्रतिक्रिया दिली आहे. 

'राज साहेब, परप्रांतिय मासेविक्रेत्यांना हटवा'; कोळी भगिनींनी मांडले गऱ्हाणे

ट्विटमध्ये निलेश म्हणतात की, SSR केसच्या AIIMS अहवाला नंतर शिवसेना उड्या मारायला लागली, त्यांना वाटतं की केसचा निकाल लागला. बॉडी नसल्यामुळे फक्त उरल्यासुरल्या गोष्टींवर अहवाल द्यावा लागला. सीबीआयचा रिपोर्ट अजून बाकी आहे. अजून खूप काय बाकी आहे एवढ्या लवकर डीजे वाजऊ नका.
 

निलेश  राणेंच्या या ट्विटवर नेटकरी व्यक्त होत आहेत. त्यांच्या ट्विटला शिवसैनिक काय उत्तर देतात. हे पाहणं महत्वाचं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena started jumping after AIIMS report Nilesh Rane pushed the army again

टॉपिकस