अखेर त्या 103  गिरगावकर कुटुंबाच्या पाठीशी शिवसेनेला उभे राहावेच लागले

दिनेश चिलप मराठे
गुरुवार, 24 मे 2018

मुंबई : मेट्रो प्रकल्पास बाधा येणाऱ्या इमारतीना कायम स्वरूपी जागा खाली करण्याच्या नोटिसा लागल्या आणि गिरगावात वातावरण चांगलेच तापले.अन्य राजकीय पक्ष ही या संदर्भात विरोधात आंदोलन करतील या शक्यतेमुळे दक्षिण मुंबई शिवसेना बाधित इमारत राहिवाश्याच्या बाजूने सरसावली आहे.

मुंबई : मेट्रो प्रकल्पास बाधा येणाऱ्या इमारतीना कायम स्वरूपी जागा खाली करण्याच्या नोटिसा लागल्या आणि गिरगावात वातावरण चांगलेच तापले.अन्य राजकीय पक्ष ही या संदर्भात विरोधात आंदोलन करतील या शक्यतेमुळे दक्षिण मुंबई शिवसेना बाधित इमारत राहिवाश्याच्या बाजूने सरसावली आहे.

या संदर्भात हाती आलेल्या माहिती नुसार काल मेट्रो रेल्वे 3 प्रकल्पास अडथळा ठरणाऱ्या इमारत क्र.268, 260 A, 260 B, 260 C, व अन्नपूर्णा निवासातील रहिवाश्यांची तातडीची बैठक घेत खासदार.अरविंद सावंत, विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी क्रांती नगर येथे 110 संवाद साधला. मेट्रो प्रकल्पाला आमचा विरोध नाही.परंतु जर हा प्रकल्प रहिवाशांच्या मुळावर येत असेल तर सहन केला जाणार नाही.असे चर्चेत स्पष्टपणे म्हटले गेले.

येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन त्याच जागेवर व्हावे, करारपत्र प्रोविजनल न देता कायम स्वरूपी द्यावे, नवीन पुनर्बांधणी होणाऱ्या इमारतीस कॉर्पस फंड मिळावा, इमारत स्थान आराखडा जाहीर व्हावा, प्रकल्पबाधित कुटुंबास प्रकल्प ग्रस्त म्हणून जाहीर करावे आणि त्यातील एका सदस्यास नोकरी द्यावी, अशा स्वरूपांच्या मागण्यांची चर्चा झाली. याच मागण्या घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि MMRCL च्या कार्यकारी संचालक अश्विनी भिडे यांच्याशी चर्चा केली जाईल असे अरविंद सावंत आणि पांडुरंग सकपाळ म्हणाले आहेत.

मेट्रो रेल्वेच्या 3 भूमिगत प्रकल्पात अवघी काही लोकं बाधित होतील असे प्रशासनातर्फे सांगितले जात होते.पण प्रत्यक्षात मेट्रो तर्फे अचानक 103 कुटुंबीय असलेल्या चाळींना कायम स्वरूपी जागा खाली करण्याची नोटीस लावण्यात आली. त्यामुळे संतप्त गिरगावकरांनी आपला आक्रोश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत जावा म्हणून गेल्या रविवारी दि.(20) ठाकुरद्वार येथे इच्छामरणाची याचना केली. याचे पडसाद गिरगावभर उमटले आणि परिस्थितीशी जुळवून घेत त्या 103  गिरगावकर कुटुंबाच्या पाठीशी शिवसेनेला उभे राहावेच लागले. अशी चर्चा गिरगावात रंगली आहे.

या संदर्भात खासदार अरविंद सावंत म्हणाले की,आजच्या झालेल्या बैठकीत प्रकल्पास आमचा विरोध नाही असे रहिवाशी म्हणाले आहेत. पहिल्या टप्प्यात जसे रहिवाश्यांना जागा, भाडे दिले,नियमा नुसार घर मिळेल असे लेखी दिले.असेच यांनाही मिळावे हाच मुख्य विषय होता.या प्रकल्पा बद्दल सुरुवातीला स्वतः उद्धव ठाकरे यांनी मिटिंग घेत माहिती घेऊन कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली होती. शिवसेना लोकांच्या पाठीशी आहे. कोणाचेही नुकसान होऊ देणार नाही. 'आम्ही गिरगावकर 'वाले उगाच नाटके करतात त्यांच्या सोबत 3 होते तर आज इथे 100 लोकं होती.तो वेदपाठक कुठे होता? असा सवालही सावंत यांनी केला.

Web Title: Shiv Sena to support Girgaon residents