अवनीवरून शिवसेनेच्या 'वाघां'चा मुनगंटीवारांवर 'हल्ला'

Shiv Sena targets Sudhir Mungantiwar over avni killing
Shiv Sena targets Sudhir Mungantiwar over avni killing

मुंबई : नरभक्षक अवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्याप्रसंगी आज (मंगळवार) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. शिवसेनेचे मंत्री या बैठकीत 'अवनी'वरून लक्ष्य करणार, हे गृहीत धरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या बैठकीला उशीरा पोहचले.

मंत्रिमंडळ बैठकीची नियोजित वेळ सकाळी अकरा वाजता असताना मुनगंटीवार हे उशीरा पोहचले. तोपर्यत इतर विभागांच्या प्रस्तावावर चर्चा करून मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मुनगंटीवार उपस्थित झाल्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी अवनीच्या हत्येचा मुद्दा उपस्थित करत वनमंत्र्यांना फैलावर घेतले. ही खडाजंगी सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक आवरती घेतली.

न्यायालयीन चौकशीची मागणी : रामदास कदम
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी अवनीच्या हत्येची न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. 'अवनीची हत्या केली असून, ज्यांनी हत्या केली आहे तेच चौकशी करत आहेत. हा केवळ चौकशीचा फार्स आहे. त्यामुळे या हत्येची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे', असे विधान कदम यांनी केले.

मीच केली न्यायालयीन चौकशीची मागणी : मुनंटीवार
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या मागणीविषयी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की अवनीच्या मृत्यूची चौकशी कोणत्याही समितीमार्फत होऊ द्या. कदम यांनी मागणी केली असली याबद्दल मला माहीत नाही; मात्र मी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com