esakal | शिवसेना बिहारच्या रिंगणात उतरणार, विधानसभेसाठी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढणार
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना ही निवडणूक लढणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे बिहारमध्ये यापूर्वीही शिवसेनेला चांगली मते मिळाली आहेत.

शिवसेना बिहारच्या रिंगणात उतरणार, विधानसभेसाठी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढणार

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : शिवसेना बिहार विधानसभेची निवडणूक लढणार आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर 45 ते 50 जागा शिवसेना लढणार आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना बिहारमध्ये भाजपची कोंडी करण्याचा विचार करत आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीच ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी सांगितले.

दलित चळवळ, आंबेडकरी विचारांचा हा विध्वंस, संजय राऊत यांची टीका
 
शिवसेनेने यापूर्वी 2015 मध्ये बिहारला 80 विधानसभा मतदारसंघ लढवले आहेत. त्यात 35 मतदारसंघांत शिवसेनेला भाजपपेक्षा जास्त मते होती; तर 8 मतदारसंघांत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती, असे देसाई यांनी सांगितले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना ही निवडणूक लढणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे बिहारमध्ये यापूर्वीही शिवसेनेला चांगली मते मिळाली आहेत.
 
शिवसेनेने बिहारसह उत्तर प्रदेश, गोवा राज्यातील निवडणुका लढवल्या आहेत. उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही निवडणुका शिवसेनेने लढवल्या आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची काही दिवसांपूर्वी भेट झाली होती. या भेटीत बिहारमधील निवडणुकीबाबतही चर्चा झाल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत होती.

(संपादन- बापू सावंत)