मुंबई पालिकेत शिवसेनेचे संख्याबळ वाढले; रामदास कांबळे विजयी  

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

मुंबई महापालिकेच्या रणसंग्रामामध्ये शिवसेनेला 84, भाजपला 82, कॉंग्रेसला 31, राष्ट्रवादी कॉंग्रेसला 9, मनसेला 7 आणि इतरांना 14 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर मनसेच्या 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यांने शिवसेनेचे संख्याबळ 90 झाले होते.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रतिक्षा नगर पोटनिवडणुकीत अटीतटीच्या लढतीत शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. शिवसेनेचे उमेदवार रामदास कांबळे विजयी झाले आहे. सायन प्रतीक्षा नगर इथल्या या विजयाने शिवसेनेचे महापालिकेतील संख्याबळ वाढले आहे. 

प्रतीक्षा नगर पोटनिवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार रामदास कांबळे यांना 6616 मते मिळाली तर विरूध्द कॉंग्रेसकडून लढलेल्या सुनील शेट्टी यांना 5771 मते मिळाली. भारीप बहूजन महासंघाचे गौतम झेंडे यांना 549 मते मिळाली तर 234 मते नोटाला देण्यात आली. शिवसेनेचे उमेदवार 845 मतांनी विजयी झाले आहेत. हा विभाग गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा गड राहिल्यामुळे यावेळी शिवसेनेचा एकतर्फी विजय होणार असल्याचे भाकित खरे ठरले. शिवसेना नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांच्या निधनामुळे या प्रभागात पोटनिवडणूक घेण्यात आली. 

मुंबई महापालिकेच्या रणसंग्रामामध्ये शिवसेनेला 84, भाजपला 82, कॉंग्रेसला 31, राष्ट्रवादी कॉंग्रेसला 9, मनसेला 7 आणि इतरांना 14 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर मनसेच्या 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यांने शिवसेनेचे संख्याबळ 90 झाले होते. 

या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने शिवसेना-भाजप दोन्ही पक्षात सत्तेसाठी नवा संघर्ष सुरु होता. या पोटनिवडणुकीच्या विजयाने शिवसेनेचा उत्साह चांगलाच वाढणार आहे. 

Web Title: Shiv Sena wins bypoll election in Mumbai Municipal Corporation