"ती कोण आहे? आमदार, खासदार, नगरसेविका आहे का?" अमृता फडणवीसांना ठाकरी भाषेत तिखट उत्तर

सुमित बागुल
Wednesday, 14 October 2020

अमृता फडणवीस यांच्या कालच्या ट्विटवर आता शिवसेनेच्या महिला आघाडीने हल्लाबोल केलाय.

मुंबई : राज्यातील मंदिरं खुली करण्यासाठी सुरु झालेलं मोठं लेटरवॉर महाराष्ट्राने पाहिलं. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील मंदिरं अद्याप का खुली करण्यात आलेली नाही? याबाबत विचारणा करत एक खरमरीत पत्र धाडलं होतं. त्यानंतर ते पत्र प्रसिद्धी माध्यमांसमोर आलं. राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जशास तसं उत्तर देखील दिलं. कालच्या या प्रकरणावर अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील आल्या होत्या. राज्यपालांच्या पात्राबाबत आणि त्यातील भाषेबाबत स्वतः राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आक्षेप घेत थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं.

महत्त्वाची बातमी : बीएमसी आयुक्त आणि महापौरांमध्ये खडाजंगी; आयुक्तांच्या माफीनंतर वादावर पडदा

दरम्यान, राज्यातील मंदिरं खुली करण्याबाबत आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. वाह प्रशासन! राज्यातील बार्स आणि मद्याची दुकाने सताड उघडी आहेत मात्र राज्यातीय मंदिरं डेंजर झोनमध्ये आहेत का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला. यापुढील वाक्यातून उद्धव ठाकरे यांचा "क्रीचर" असा नाव न घेत उल्लेख करत कधी कधी सर्टिफिकेट गरजेचं असतं, असंही अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना डिवचत ट्विट केलेलं पाहायला मिळतंय.

अमृता फडणवीस यांचं ट्विट : 

महत्त्वाची बातमी :  3 वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेच्या पोटातील अल्सरवर यशस्वी शस्त्रक्रिया

शिवसेनेचं ठाकरी भाषेत तिखट उत्तर :  

अमृता फडणवीस यांच्या कालच्या ट्विटवर आता शिवसेनेच्या महिला आघाडीने हल्लाबोल केलाय. मुंबई महानगरपालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी अमृता फडणवीस यांना ठाकरी, तिखट भाषेत खडेबोल सुनावलेत. अमृता फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत त्यांनी म्हंटल की, " 'ती कोण आहे? आमदार, खासदार, नगरसेविका आहे का? ती कधी राजकारणात आली? नवरा मुख्यमंत्री झाल्यानंतर ती बोलू लागली. ती माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी आहे, तिनं त्या भूमिकेत राहावं. मात्र आम्हाला हिंदुत्वाचे धडे देऊ नयेत. शिवसेनेची राजकारणातली ही चौथी पिढी आहे. त्यामुळे उगाच प्राणी वगैरे म्हणून टीका आम्ही सहन करणार नाही. आम्ही जर तोंड उघडलं तर तोंड लपवायला जागा राहणार नाही. ट्विटरवरून नको, समोर येऊन बोला, असं थेट आव्हान शिवसेनेकडून अमृता फडणवीस यांना देण्यात आलं आहे. 

shiv sena women front replies to the tweet of amruta fadanavis over temple issue

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shiv sena women front replies to the tweet of amruta fadanavis over temple issue