उल्हासनगरात शिवसेनेचा पाण्यासाठी मोर्चा; आयुक्तांच्या दालनात ठिय्या

Shiv Senas Agitation for water in Ulhasnagar
Shiv Senas Agitation for water in Ulhasnagar

उल्हासनगर - धरण तुडुंब भरले असून पावसाळा सुरू असतानाही नागरिकांचा घसा कोरडा राहत असल्याने संतप्त झालेल्या शिवसेनेने आज दुपारी मोर्चा काढून उल्हासनगर महानगरपालिका गाठली. मात्र आयुक्त गणेश पाटील नसल्याने शिवसेनेने आयुक्तांच्या दालनात शिरकाव करून ठिय्या आंदोलन केले. हा प्रकार समजताच मध्यवर्ती ठाण्याने पालिकेत फौजफाटा तैनात केला.

शिवसेनेच्या पॅनल 13,14,15 मध्ये सातत्याने अपुरा पाणीपुरवठा केला जात आहे. बऱ्याचदा तर कोणतीही सूचना न देता मध्यरात्री पाणी सोडले जाते. त्यामुळे नागरिकांचा घसा कोरडा राहत असल्याने आज दुपारी आमदार डॉ. बालाजी किणीकर, गटनेते रमेश चव्हाण, सुनील सुर्वे, नगरसेवक शेखर यादव, अरुण आशान, सुमित सोनकांबळे, सुरेंद्र सावंत, नगरसेविका लिलाबाई आशान, शितल बोडारे, वसुधा बोडारे, जोत्स्ना जाधव, विभागप्रमुख बापू सावंत, राजू माने, राकेश कांबळी, राजू धावारे, सुनील सानप आदी शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला.

पालिकेत आल्यावर आयुक्त गणेश पाटील हे त्यांच्या दालनात नसल्याचे समजताच आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या सोबत नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनात शिरकाव करून खुर्चीवर ठिय्या आंदोलन सुरू केले. मध्यवर्ती ठाण्याला ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक निरीक्षक विजय डोळे यांनी पोलिस व महिला पोलिसांच्या फौजफाट्या सोबत पालिका गाठून कोणतीही अनुचित घटना घडू नये याची दक्षता घेऊन बंदोबस्त तैनात केला होता.

अखेर आयुक्त गणेश पाटील हे सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आल्यावर त्यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. नियमित पाणीपुरवठा कसा होणार याची दक्षता घेताना पाण्याची वेळ नागरिकांना कळवा. अशा सूचना देताना लवकरात लवकर पाण्याची समस्या दूर केली जाणार, असे आश्वासन शिवसेनेला दिले. यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com