उल्हासनगरातील अंधअपंगांना प्रवासासाठी सवलतीचे एसटी पास शिवसेनेचा पुढाकार

दिनेश गोगी
रविवार, 17 जून 2018

उल्हासनगर : शिवसेना अपंग सहाय्य सेनेच्या पुढाकाराने शहरातील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपले आयुष्य जगणारे गोर गरीब, निराधार अपंग जोडप्यांना दारिद्र्य रेषेखाली येणाऱ्या अंत्योदय शिधापत्रिका, अंधअपंगांना महाराष्ट्र राज्यात एस टी प्रवास करण्यासाठी सवलतीच्या पास चे वाटप शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.

 कॅम्प नंबर 4 मधील वॉटरसप्लाय कार्यालया जवळ शिवनगर शाखेत शिवसेना अपंग सहाय्य सेनेचे कल्याण लोकसभा अध्यक्ष भरत खरे यांच्या पुढाकाराने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

त्यात एस टी महामंडळाकडून राज्यभरात प्रवास करण्यासाठी अपंगांना 75 टक्के व अंधांना 100 टक्के सवलत देण्यात येते. मात्र, याबाबत अनभिज्ञ असलेल्या या उपेक्षितांना सवलतीचे पास तसेच दारिद्र्य रेषेखालील गरिबांना अंत्योदय शिधापत्रिकेचे वाटप शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या हस्ते  करण्यात आले.या प्रसंगी विभाग प्रमुख राजू माने,युवासेनेचे प्रशांत जाधव, सागर उटवाल, प्रा. प्रकाश माळी आदी उपस्थित होते.
 
राजेंद्र चौधरी व आमदार डॉ बालाजी किणीकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली खरे यांनी शिधावाटप अधिकारी सानप, सहा शिधावाटप अधिकारी डी.के.चौधरी, शिधावाटप निरीक्षक राठोड यांच्या सहकार्याने या वंचित कुटुंबाला अंत्योदय शिधापत्रिका विनामूल्य मिळवून दिल्या. तसेच अंध अपंग याना समाजकल्याण विभागाचे संख्ये, निंबाजी वाघ यांच्या सहकार्याने एसटी चे सवलतीचे पास उपलब्ध करून दिले.
 
Web Title: Shiv Sena's initiative to pass the ST passes for traveling to blind people in Ulhasangan