ऐतिहासिक वस्तुंच्या संवर्धनासाठी शिवाजी महाराज संग्रहालयाचा उपक्रम 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या कला वस्तू संवर्धन विभागात हडप्पाकालीन ते पाश्‍चिमात्यांच्या इतिहासकालीन अनेक वस्तुंचे जतन करण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर परदेशातील संग्रहालयांमधील काही वस्तुंचे संवर्धनही विभागातील प्रशिक्षकांनी केले आहे. तसेच, देशातील अनेक संग्रहालयांना संवर्धनाचे धडे हा विभाग देतो. संवर्धनाचे हे काम कसे चालते, याबाबत जाणून घेण्यासाठी 4 नोव्हेंबर रोजी "आस्क कॉन्झव्हेटर डे' या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या इन्स्टाग्राम व ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून केले आहे. 

विषयात अभिरुची असलेले अभ्यासक आणि नागरिक म्युझियमच्या @csmvsmumbai या इन्स्टाग्राम व ट्विटर अकाऊंटवर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेदरम्यान थेट प्रश्‍न किंवा संवाद साधू शकतात. त्याला संवर्धन विभागाचे पथक आणि सहायकप्रमुख (क्‍युरेटर) ओमकार कडू स्वतः उत्तर देतील. 

 ऐतिहासिक कला वस्तुंचे जतन करणे आवश्‍यक आहे. त्या इतिहासाचे प्रतिनिधीत्व तसेच गतकाळातील संस्कृतीविषयी माहिती देतात. पूर्वजांकडून मिळणारी माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी या वस्तू जपणे आवश्‍यक आहे. यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 
- ओमकार कडू, सहायक क्‍युरेटर, संवर्धन विभाग
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivaji Maharaj Museum initiative for the conservation of historical objects