महापालिका कर्मचारी, विद्यार्थ्यांना ‘वचन’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

मुंबई - शिवसेनेने सोमवारी महापालिका निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यात विद्यार्थी आणि महापालिका कर्मचाऱ्यांना अधिक महत्त्व देण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन शिवसेनेसाठी महत्त्वाचा असल्याने या दिवशीच हा ‘वचननामा’ जाहीर करण्यात आला. युती झाल्यास त्यांच्या सूचनांचाही विचार करू, असे ‘वचन’ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. बस व मेट्रोसाठी एकच पास ही योजना सुरू करण्याची घोषणा करून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे.

महापालिकेचे एक लाखाच्या आसपास कर्मचारी आहेत. बेस्टचेही हजारो कर्मचारी आहेत. ते प्रामुख्याने मुंबई व ठाणे परिसरात राहतात. पालिका कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांसाठी घरकुल योजना राबवण्याबरोबरच कर्मचाऱ्यांना गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक देण्याचे आश्‍वासन शिवसेनेने दिले आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विमा योजना लागू होणार आहे. गणवेशधारी विद्यार्थ्यांना बेस्टचा प्रवास मोफत करण्यात येणार आहे. फुटबॉलसाठी मैदाने तयार करून नेमबाजीचे प्रशिक्षण केंद्र बनवण्याचेही आश्‍वासन शिवसेनेने दिले आहे. गेल्या निवडणुकीत महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा अकादमी स्थापन करण्याचे दिलेले आश्‍वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. चार मोठे जलतरण तलाव बांधून त्यात पालिका विद्यार्थ्यांच्या जलतरणाची मोफत सोय करण्याचे वचनही शिवसेनेने दिले आहे.

२४ तास पाणी
गारगाई-पिंजाळ या प्रकल्पांसाठी केंद्र सरकारच्या परवानग्या मिळवून ते वेळेत पूर्ण केल्यानंतर मुंबईला २४ तास पाणीपुरवठा करण्याचे आश्‍वासन शिवसेनेने दिले आहे. हे आश्‍वासन महापालिकेने २००९-१० च्या अर्थसंकल्पात दिले होते.

वचननाम्यातील ठळक मुद्दे
 मालमत्ता करात सूट
 बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना
 गोवंडी येथे शताब्दी रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय
 तरुणांसाठी ई-वाचनालय
 व्यवसायाभिमुख शिक्षणाला चालना
 महापालिकेच्या शाळांत शिकलेल्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या नोकरीत प्राधान्य
 सर्व विभागांत पाळणाघरे
 ओपीडी ऑन व्हील संकल्पना, मधुमेहासाठी विशेष रुग्णालय
 जेनेरिक औषधांची दुकाने
 सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन
 रात्रीही कचरा उचलणार, देवनार डम्पिंगवर प्रक्रिया प्रकल्प उभारणार
  रेल्वे स्थानकांबाहेर दुचाकींसाठी स्टॅण्ड.
 ‘डबेवाला भवन’ आणि ‘मराठी रंगभूमी दालन’

Web Title: Shive Sena published famous manifesto for the municipal elections on Monday