शिवजलक्रांती ते विधान परिषद आमदार...!

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

सात महिन्यांत शिवसेनेने दिले नवे राजकीय "नेतृत्व'
मुंबई - जन्म पश्‍चिम महाराष्ट्रात... विकास काम मागास मराठवाड्यात... तर राजकारणातला पहिला विजय थेट विदर्भात...! केवळ सात महिन्यांत राजकीय जीवनाची घडी बसवत नव्या दमाचे नवे नेतृत्व शिवसेनेने दिले ते प्रा. तानाजी सावंत यांच्या रूपाने. ऐन दुष्काळात उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परांडा तालुक्‍यात शेतकऱ्यांसाठी श्‍वाश्‍वत विकासाचे भगीरथ प्रयत्न करणारे "सर' म्हणून तानाजी सावंत यांची ओळख झाली आहे.

"शिवजलक्रांती'च्या माध्यमातून त्यांनी या दोन्ही तालुक्‍यांतल्या दुष्काळावर कायमस्वरूपी मात करणारे काम उभे केले आहे. पुण्यात शैक्षणिक संस्था, सोलापूर व उस्मानाबादमध्ये खासगी साखर कारखानदारी करताना सावंत एक उद्योजग म्हणून समोर आले. शिवसेनेत काम करताना त्यांना फारशी संधी मिळाली नाही. स्थानिक नेत्यांनी त्यांच्याकडे केवळ "रसद' पुरवणारा नेता म्हणूनच पाहिले. पण विकासकामांची "तहान' असलेल्या सावंत यांनी कायम तहानलेल्या दुष्काळी भागाला ऐन उन्हाळ्यात दिलासा देण्याचा प्रयत्न केला. तब्बल 11 मृत नद्यांना पुनरुज्जीवित करताना भूम व परांडा तालुक्‍यांत त्यांनी उभारलेल्या शिवजलक्रांतीच्या कामाची दखल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनावर घेतली. संपूर्ण दोन्ही तालुक्‍यांत 145 किलोमीटर लांबीचे नदी व नाले खोलीकरण व रुंदीकरणाचे काम केवळ दीड महिन्यात करण्यात आले. सरकारचा एकही रुपया न घेता त्यांनी हे काम स्वखर्चाने केले. एप्रिलच्या सुरवातीलाच 46 अंश तापमानात उद्धव ठाकरे यांनी या कामाचे लोकार्पण केल्यानंतर सावंत यांच्या पाठीवर थाप मारली. शिवसेना पक्षप्रमुखांनीही या कामाचे कौतुक म्हणून "जलपूजन' कार्यक्रम घेतला.

एकाच तालुक्‍यात दीड महिन्यात शिवसेना पक्षप्रमुखांना विकासकामासाठी आणणारे सावंत यांच्या विकासदृष्टीला अखेर शिवसेनेने न्याय दिल्याचे मानले जाते. सात महिन्यांच्या कालावधीतच त्यांना उपनेते पद व यवतमाळ विधान परिषदेची उमेदवारी दिली. परक्‍या उमेदवाराला आस्मान दाखविण्याची यवतमाळची परंपरा. कॉंग्रेसचे गुलाम नबी आझाद यांचा पराभव करणारी जनता सावंतांसारख्या उमेदवाराला स्वीकारेल की नाही अशी शंका होती. पण सावंत यांनी राष्ट्रवादीचे हेवीवेट उमेदवार संदीप बजोरिया यांनाही आपल्याकडे खेचले. अखेर, चुरशीची लढत एकतर्फी झाली. सात महिन्यांच्या कालावधीतच सावंत यांचा राजकीय प्रवास मुख्य प्रवाहात आला. सावंत यांच्या रूपाने शिवसेनेने नवा नेता दिल्याचे मानले जात आहे.

Web Title: shivjalkranti to vishan parishad mla