मुंबई-औरंगाबादसाठी एसटीची शिवनेरी रातराणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

मुंबई - एसटी महामंडळाने मुंबईहून थेट औरंगाबादसाठी शिवनेरी रातराणी बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी मुंबई-कोल्हापूर मार्गावर ही बस सुरू होती. मात्र अवाजवी तिकीट दरामुळे प्रवाशांनी तिला कमी प्रतिसाद दिला. अखेर ती बस बंद करण्याचा निर्णय एसटीने घेतला.

मुंबई - औरंगाबाद या मार्गावर एसटीची 9 डिसेंबरपासून शिवनेरी रातराणी बससेवा सुरू होणार आहे. मुंबई सेंट्रल आगारातून रात्री 10.30 वा. ही बस सुटेल. पुणे (शिवाजीनगर), नगरमार्गे ही बस सकाळी 5.45 वाजता औरंगाबादला पोचेल. परतीच्या प्रवासात औरंगाबादहून ही बस रात्री 10.30 वाजता मुंबईसाठी रवाना होईल. या बसचे तिकीट 1096 रुपये आहे. एसटी "शिवनेरी' बसच्या आधारावर रातराणीचा प्रयोग सुरू केला आहे. मुंबई - औरंगाबाद मार्गावर सध्या सकाळी 5.30 वा. शिवनेरीची एक बस सुटते. ती दुपारी 3 वाजता औरंगाबादला पोचते. प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याचा महामंडळांचा दावा आहे. नगर-औरंगाबाद मार्गावर प्रवाशांची संख्या अधिक असल्याने मुंबई - कोल्हापूर या बससारखी ही बस रद्द करण्याची वेळ येणार नाही, असा अधिकाऱ्यांचा दावा आहे.

Web Title: shivneri st for mumbai-aurangabad