'जो रामाचा नाही, तो कामाचा नाही...'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

एका शिवसैनिकाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रमेश सोळंकी असे त्यांचे नाव असून, त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याबद्दलची माहिती ट्विटरवरून दिली आहे.

मुंबई : एका शिवसैनिकाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रमेश सोळंकी असे त्यांचे नाव असून, त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याबद्दलची माहिती ट्विटरवरून दिली आहे.

सोळंकी यांनी ट्विटवर म्हटले आहे की, 'मी शिवसेनेच्या युवा सेनेच्या पदाचा राजीनामा देत आहे. माझा अंतरात्मा आणि वाचारधारा काँग्रेससोबत काम करण्याची परवानगी देत नाही. गेल्या काही दिवसांपासून माझे मत जाणून घ्यायचे होते. आता मला माझी भूमिका मांडायची आहे. जो माझ्या श्रीरामाचा नाही (काँग्रेस), तो माझ्या काही कामाचा नाही आहे. पुन्हा एकदा आदित्या ठाकरे यांचे धन्यवाद. तुमच्यासोबत काम करण्यात आनंद मिळाला. मी, कोणत्याही पदाची किंवा तिकिटाची मागणी केलेली नाही. महाराष्ट्रात सरकार बनविण्यासाठी आणि मुख्यमंत्री बनविल्याबद्दल शिवसेनेला शुभेच्छा. माझा अंतरात्मा आणि वाचारधारा काँग्रेससोबत काम करण्याची परवानगी देत नाही. माझे पद, माझा पक्ष आणि सहकाऱ्यांसाठी हे योग्य नाही. जेव्हा जहाज बुडायला लागते तेव्हा पहिले उंदीर उड्या मारायला लागतात. पण मी माझा पक्ष सर्वोच्च उंचीवर असताना सोडत आहे.

दरम्यान, सोळंकी यांनी ट्विट व छायाचित्र सोशल मीडियावरून व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsainik ramesh solanki resigns over maha vikas aghaadi