शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेच्या पैशांसाठी शिवसेनेचा मोर्चा  

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

माहिम विधानसभेचे आमदार सदा सरवणकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी प्रभादेवी ते टाटा प्रेस येथील आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनी असा मोर्चा काढण्यात आला. 

मुंबई : शेतकऱ्यांचे पीक विमा योजनेचे पैसे तातडीने मिळालेच पाहिजे, यासाठी प्रभादेवी येथील आयसीआयसीआय लोंबार्ड विमा कंपनीवर शिवसेनेच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. 

माहिम विधानसभेचे आमदार सदा सरवणकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी प्रभादेवी ते टाटा प्रेस येथील आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनी असा मोर्चा काढण्यात आला. यावेळी वरळी विधानसभेचे आमदार सुनील शिंदे, नगरसेवक आशिष चेंबूरकर, नगरसेविका किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, स्नेहल आंबेरकर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, सर्व शाखा प्रमुख, पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. 

शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेचे पैसे मिळालेच पाहिजे, अशी घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली १५ दिवसांपूर्वी शेतकऱ्यांचे पीक विमा योजनेचे पैसे मिळावेत म्हणून मोर्चा काढण्यात आला होता. त्यात १५ दिवसात पैसे देण्यात यावे, म्हणून विमा कंपन्यांना तसा इशारा देण्यात आला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena agitation against crop insurance companies in Mumbai