''ठाकरे' शिवाय दुसरा चित्रपट चालू देणार नाही'

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर बाळा  लोकरे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर लिहिले आहे, की 'ठाकरे' चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या दिवशी कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला तरी आम्ही चालू देणार नाही. जर कुणी चित्रपट प्रदर्शित करणार असेल तर त्याला शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ. 

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील 'ठाकरे' हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होत असून, यादिवशी इतर चित्रपट चालू देणार नाही असा इशारा शिवसेना चित्रपट सेनेचे सरचिटणीस बाळा लोकरे यांनी दिला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे, लिखाण आणि व्यंग्यचित्रे कधीच सेन्सॉरच्या कात्रीत अडकली नाहीत, त्यामुळे त्यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटही सेन्सॉरच्या कचाट्यात अडकणार नाही; त्याला कोणत्याही सेन्सॉरची भीती वाटत नाही, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले होते. अनेक दिवसांपासून उत्सुकता असलेल्या ‘ठाकरे’ या चित्रपटाचे हिंदी व मराठी ट्रेलर वडाळा येथील आयमॅक्‍स या मल्टिप्लेक्‍समध्ये प्रदर्शित करण्यात आले. या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे, चित्रपटाचे निर्माते संजय राऊत, दिग्दर्शक अभिजित पानसे, अभिनेते नवाजुद्दीन सिद्दिकी, अमृता राव, ‘वायकॉम १८’चे अजित अंधारे, निखिल साने व अन्य उपस्थित होते. शिवसेना कार्यकर्त्यांनी ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद’ अशा घोषणांनी चित्रपटगृह दणाणून टाकले.

या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर बाळा  लोकरे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर लिहिले आहे, की 'ठाकरे' चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या दिवशी कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला तरी आम्ही चालू देणार नाही. जर कुणी चित्रपट प्रदर्शित करणार असेल तर त्याला शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ. 

Web Title: ShivSena Bala Lokare warned on Thackeray movie