शिवसेनेच्या वाघाने फाडले आशिष शेलारांचे कपडे, मुंबईत बॅनरबाजी..

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 February 2020

या होर्डिंगमध्ये आशिष शेलार हे फाटक्या कपड्यांमध्ये नग्नं अवस्थेत दाखवण्यात आलेत. 

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण थंड होण्याचं नाव घेत नाहीये. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाचे संपादक संजय राऊत यांना प्रकट मुलाखत दिली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात केंद्राचा NRC कायदा लागू होऊ देणार नाही अशी भूमिका घेतलेली आपण पाहिलं. यावर टीका करताना भाजप नेते आशिष शेलार यांची जीभ घसरली आणि त्यांनी थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला. आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकारण पेटलं आणि आशिष शेलार यांना बॅकफूटवर जात पत्रकार परिषद घेऊन माफी मागावी लागली.

मात्र प्रकरण तिथवरच थांबलेलं नाही, आशिष शेलार हे आता शिवसेनेच्या निशाण्यावर आहेत, त्याला कारण म्हणजे मुंबईतील भाजप ऑफिस समोर करण्यात आलेली बॅनरबाजी. भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर शिवसैनिक नाराज आहेत, मुंबईत आशिष शेलार यांच्या फोटोजचे वादाग्रस्त बॅनर्स आता लागलेत.

मोठी बातमी - "राष्ट्रवादीची सत्ता आहे.. मग तर एकच शिव जयंती झालीच पाहिजे!"

काय लिहिलंय बनर्सवर

भाजप आमदार आशिष शेलार यांच्या विरोधात लागलेल्या बॅनर्सवर आशिष शेलार यांचा फोटो अर्धनग्नावस्थेत आहे. यामध्ये आशिष शेलार यांना फाटक्या कपड्यांमध्ये दाखवण्यात आलंय. याचसोबत यापुढे  "आ'शिषे' मे देख" असं देखील लिहिण्यात आलंय. यापुढे राजकारणातील हि... जाडा असंही लिहिलंय. या चित्रात एक वाघ बाहेर जाताना दिसतोय. 

कालच डोंबिवलीतही आशिष शेलार यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. काल शिवसैनिकांनी त्यांची अक्कल  देखील काढली, आशिष शेलार यांची बुद्धी गुडघ्यामध्ये आहे, अशी टीका काल करण्यात आली होती. 

Image may contain: 1 person

मोठी बातमी - नवी मुंबईत भाजपचे नेते म्हणतायेत "आहीस्ता चलो रे'

महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून विरोधात बसलेला भाजप त्यांच्या पूर्वाश्रमीच्या मित्रावर म्हणजेच शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीये. अशात आशिष शेलार यांची थेट शिवसेनापक्षाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जीभ घसरलीये. आशिष शेलार यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना शेलार यांना शिंगावर घेणार हे निश्चित होतं. आशिष शेलार जिथे जातील तिथे त्यांच्याविरोधात आंदोलनं केली जातील असं शिवसेनेने म्हंटलंय.

त्यामुळे येत्या काळात आशिष शेलार यांच्याविरोधात शिवसेनेचं हे आंदोलन सुरूच राहील असं बोललं जातंय.

shivsena banners against ashish shelar after his statement on uddhav thackeray 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena banners against ashish shelar after his statement on uddhav thackeray