सोईनुसार ‘ब्रेक अप आणि पॅच अप’

Shivsena-Bjp
Shivsena-Bjp

कल्याण - आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवली शहरात शिवसेना आणि भाजपमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन उरकण्यात तीव्र स्पर्धा सुरू असल्याचे चित्र आहे. 

गेल्याच महिन्यात कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो ५ आणि इतर कामांचे भूमिपूजन झाले. यानंतर शिवसेनेने मंगळवारी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन केले.

तसेच पत्रीपूल, कल्याण - शीळफाटा रस्ता रुंदीकरणाचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकताच गेल्या आठवड्यात संपन्न झाला. त्यामुळे सेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा सुरु असल्याचे चित्र आहे. मात्र या स्पर्धांदरम्यानच  मंगळवारी शिवसेना आणि भाजपाचे नेते व्यासपीठावर एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सोईनुसार ब्रेक अप आणि पॅच अप करण्याची भूमिका हे दोन्ही पक्ष अवलंबत असल्याने सर्वसामान्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

विकासासाठी युती कायम
लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणि केंद्रात शिवसेना भारतीय जनता पक्षामध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धामुळे या कार्यक्रमाच्या ठिकाणी नेमके काय होणार याबाबत उत्सुकता होती; मात्र दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावत कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी युती कायमच काम करीत राहील, असे आश्वासन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com