लाईन डेड होईपर्यंत युतीची डेडलाईन!

Devendra-Fadnavis
Devendra-Fadnavis

मुंबई - ‘‘शिवसेना भाजपसमवेत राहावी यासाठी कोणतीही ‘डेडलाईन’ नाही. ‘लाईन’ जोपर्यंत ‘डेड’ होत नाही, तोपर्यंत चर्चा सुरूच राहील,’’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले. 

शिवसेनेला सोबत ठेवणे हे हिंदुत्वाच्या मतांचे विभाजन टाळण्यासाठी आवश्‍यक असल्याची भूमिका भाजपने घेतली आहे. मुख्यमंत्री आमचाच अशी अट शिवसेनेने घातली तर काय भूमिका घेणार, यावर मुख्यमंत्री आपलाच व्हावा असे प्रत्येक पक्षाला वाटते, असे सांगत फडणवीस यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले. ‘‘महाराष्ट्रातील दुष्काळाचे वास्तव सरकारने लक्षात घेतले आहे, त्यामुळे पेयजलापासून अन्नधान्यापर्यंत कोणतीही टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल,’’ असे ते म्हणाले. जलयुक्त शिवारामुळे पीक उत्पादकता प्रचंड वाढल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला.  

विरोधकांनी दुष्काळाचे राजकारण करू नये, योग्य त्या सर्व सूचनांचे सरकार स्वागत करेल आणि समस्या सोडवण्याचे प्रयत्नही केले जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

साक्ष देण्यास तयार
शहरी नक्षलवादाविरोधात सरकारकडे भक्कम पुरावे असून, न्यायालयात पाच संशयितांवरचे गुन्हे सिद्ध करता येतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. कोरेगाव- भीमा प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाने साक्षीदार म्हणून बोलावल्यास स्वत: हजर होऊ, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com