esakal | भाजप महिला कार्यकर्त्यावर हल्ला; ७ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप महिला कार्यकर्त्यावर हल्ला; ७ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल

भाजप महिला कार्यकर्त्यावर हल्ला; ७ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भाजप पदाधिकाऱ्यांवरही कोरोना नियमांच्या उल्लंघनाबाबत गुन्हा

मुंबई: शिवसेना भवनासमोर झालेल्या हाणामारी प्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात कोविड काळात जमावबंदीचा नियम मोडून मोर्चा काढल्याप्रकरणी भादंवि कलम 188, 269 सह राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा कलम 51 अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरीकडे मारहाण आणि विनयभंग प्रकरणी भादंवि कलम 143, 147, 149, 392, 324, 323, 354,50 अंतर्गत ७ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. (Shivsena BJP Sena Bhavan Ugly Fight FIR registered against Shivsena leaders for misbehave with females)

हेही वाचा: सेना भवन राडा: "शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली"

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या बांधणीसाठी खरेदी केलेल्या जमिनीत घोटाळा झाल्याचे आरोप आपच्या नेत्यांनी केले. त्यानंतर मंदिर बांधणीबाबत भ्रष्टाचार होत असल्याबद्दल संशय शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातून व्यक्त केला. तसेच, अनेक शिवसेना नेत्यांनी याप्रकरणी काही वक्तव्ये केली. या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या गेलेल्या काही भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनाबाहेर फटका आंदोलन केले. पण या ठिकाणी आंदोलन करून देणार नाही असं सांगत शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. या घटनेदरम्यान भाजपच्या महिला कार्यकर्त्यांशी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वाईट वर्तणूक केली असा आरोप करत भाजपच्या एका महिला कार्यकत्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली.

हेही वाचा: भाजप-शिवसेनेमध्ये तुफान राडा; शिवसेना भवनासमोर घडला प्रकार

एकूण सात शिवसैनिकांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला. भाजप नेत्यांच्या आंदोलनानंतर माहीम पोलिस ठाण्यात ही कागदोपत्री कारवाई करण्यात आली. पण हा गुन्हा शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्याचे उपायुक्त (परिमंडळ-5) प्रणय अशोक यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, मोर्चा संपला असे वाटत असतानाच अचानक शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. शिवसैनिकांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना मारहाण केली. काहींचे कपडेही फाडले. त्यावेळी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले.

loading image