शिवसेनेचा मोदींच्या कार्यक्रमावर बहिष्कार 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

दोन्ही कार्यक्रमात शिवसेनेचे कोणही पदाधिकारी आणि निमंत्रित पालकमंत्री उपस्थित रहाणार नाहीत, असे आदेशचं पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत. मुंबईतील कोस्टल रोड भूमीपूजन कार्यक्रमात भाजपचे कोणही पदाधिकारी उपस्थिती नव्हते.

मुंबई :  आज कल्याण आणि पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो प्रकल्पांच्या भूमीपूजन सोहळ्यात शिवसेनेनं बहीष्कार घातला आहे.

दोन्ही कार्यक्रमात शिवसेनेचे कोणही पदाधिकारी आणि निमंत्रित पालकमंत्री उपस्थित रहाणार नाहीत, असे आदेशचं पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत. मुंबईतील कोस्टल रोड भूमीपूजन कार्यक्रमात भाजपचे कोणही पदाधिकारी उपस्थिती नव्हते.

लोकसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेना भाजपमध्ये सुसंवाद नसल्याचं या दोनही कार्यक्रमांमुळे पुन्हा एकदा समोर आले आहे. दरम्यान कल्याणमध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वतीने मोठी मोठी होर्डींग्ज लावून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले होते. ‘शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश’ या बॅनरखाली शिंदे यांनी मोदींच्या आगमनाबाबत अभिनंदन व स्वागताचे होर्डिंग्ज लावले आहेत.

Web Title: ShivSena boycott in Narendra Modi programme in Mumbai