भाजपकडून साम-दाम-दंड-भेदाचा वापर: श्रीनिवास वनगा

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 मे 2018

ईव्हीएमबद्दल मला शंका आली. अनेक मशीन्स बंद पडल्या. नागरिकांना बराच वेळ थांबावे लागल्यानंतर अनेक नागरिक निघून गेले. निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानाच्या दिवशी 47 टक्के आणि दुसऱ्या दिवशी 53 टक्के मतदानाची टक्केवारी सांगितली. त्यामुळे संशयास्पद आहे. 2019 ला उमेदवारीसाठी मी तयारी करणार आहे.

पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपने साम-दाम-दंड-भेद याचा वापर करू विजय मिळविला. याबद्दल आता जनता नक्की विचार करेल. महाराष्ट्राच्या भविष्यासाठी शिवसेनाशिवाय पर्याय नाही, असे शिवसेनेचे पालघरमधील उमेदवार श्रीनिवास वनगा यांनी सांगितले.

पालघरमध्ये भाजपचे राजेंद्र गावित आणि शिवसेनेच्या वनगा यांच्या लढत होती. गावित यांनी 44 हजार मतांनी विजय मिळविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणुकी ऑ़डिओ क्लिप प्रसिद्ध झाली होती. यामध्ये त्यांनी साम-दाम-दंड-भेद याचा वापर करण्याचे म्हटले होते. यावरून शिवसेनेने जोरदार टीका केली होती. आता वनगा यांनीही भाजपला लक्ष्य केले आहे.

श्रीनिवास वनगा म्हणाले, की मी मतदारांचे आभार मानतो. शिवसेनेने पहिल्यांदा याठिकाणी निवडणूक लढली. खूप कमी कालावधीमध्ये आम्ही गावोगावी जाऊन कार्यकर्ते तयार केले. भविष्यात आम्ही नक्कीच कोठे चुका झाल्या याचा आढावा घेऊ. 2019 मध्ये उद्धव ठाकरे जे उमेदवार देतील त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करू. भाजपने माझ्या बाबांचा फोटो लावून मते मागितली. कारण, वनगा म्हणजे कमळ हे समीकरण होते. त्यामुळे काही मते भाजपला मिळाली. माझ्या बाबांचे कार्य पुढे करू शकत नाही, याचे दुःख वाटतय. ईव्हीएमबद्दल मला शंका आली. अनेक मशीन्स बंद पडल्या. नागरिकांना बराच वेळ थांबावे लागल्यानंतर अनेक नागरिक निघून गेले. निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानाच्या दिवशी 47 टक्के आणि दुसऱ्या दिवशी 53 टक्के मतदानाची टक्केवारी सांगितली. त्यामुळे संशयास्पद आहे. 2019 ला उमेदवारीसाठी मी तयारी करणार आहे.

Web Title: ShivSena candidate Srinivas Wanga criticize BJP in Palghar