मोठी बातमी - कोरोनावर उपचार घेणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

मुंबईतील भाईंदरचे शिवसेना नगरसेवक हरिशचंद्र आमगावकर यांचं निधन झाल्याची बातमी समोर येतेय.

मुंबई - कोरोना महामारीमुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. कोरोनामुळे प्राण गमावणाऱ्यांमध्ये सामान्य नागरिक तर आहेतच मात्र यामधून सिने कलाकार, पोलिस, आरोग्य कर्मचारी हे देखील वाचले नाहीत. अशात गेल्या काही दिवसात आपल्या समोर बातम्या आल्यात त्या महाविकास आघाडीतील मंत्र्यांना झालेल्या कोरोनाबाबत. सुदैवाने जितेंद्र आव्हाड आणि अशोक चव्हाण हे दोघेही मंत्री कोरोनमुक्त झालेत. मंत्री, नेते मंडळी, राजकारणी यांचा थेट नागरिकांशी संपर्क येत असतो. म्हणून याना देखील कोरोनाची लागण होण्याचा धोका सर्वाधिक आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातून एक दुःखद बातमी समोर येतेय. 

मोठी बातमी! गायीच्या शरीरातील अँटीबॉडीज कोरोनावर ठरतील गुणकारी? वाचा कोणी केलाय हा दावा... 

मुंबईतील भाईंदरचे शिवसेना नगरसेवक हरिशचंद्र आमगावकर यांचं निधन झाल्याची बातमी समोर येतेय. गेले काही दिवस ते ठाण्यातील खासगी रुग्णालयात कॉर्नवर उपचार घेत होते अशी माहिती आहे. या बातमीने राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जातेय. याबाबत शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी ट्विट करत माहिती दिलीये. 

मोठी बातमी - आदित्य ठाकरेंच्या 'त्या' ट्विटचा नेमका अर्थ काय?, राऊतांनी केलं रिट्विट

दरम्यान नगरसेवक हरिशचंद्र आमगावकर यांची काल रात्री प्रकृती अत्यावस्थ झाल्याची बातमी, सूत्रांकडून मिळत आहे.

shivsena corporator harishchandra amgaonkar lost his life while taking covid treatment


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena corporator harishchandra amgaonkar lost his life while taking covid treatment