शिवसेनेतील ‘लोकशाही’ रद्द!

- समीर सुर्वे
बुधवार, 18 जानेवारी 2017

शाखांतून उमेदवार निश्‍चित न झाल्यास ठाकरे उमेदवार ठरवतील.  त्यामुळे मुलाखतीची प्रक्रिया होण्याची शक्यता कमी...

मुंबई - निवडणुकीतील उमेदवार निश्‍चित करण्यासाठी मुलाखती घेण्याची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेली लोकशाही पद्धत बंद करण्याचा निर्णय त्यांनी स्वत:च घेतल्याचे समजते. सर्व शाखांमधील इच्छुकांनी ठरवून एक उमेदवार निश्‍चित करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

शाखांमधून उमेदवार निश्‍चित न झाल्यास उद्धव ठाकरे उमेदवार ठरविणार आहेत; मात्र त्यात मुलाखतीची प्रक्रिया न होण्याची शक्‍यता आहे. मुलाखती घेऊन उमेदवार निश्‍चित करण्याच्या पद्धतीवर ‘पक्षात लोकशाही कशाला’ असा प्रश्‍न स्वत: दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विचारला होता.

उद्धव प्रत्येक शाखेतील इच्छुकांची भेट घेत असून त्यांनाच उमेदवार निश्‍चित करण्यास सांगत आहेत. उमेदवार निश्‍चित न झाल्यास उद्धव स्वतःच उमेदवार ठरवतील. या उमेदवाराला कुणीही आक्षेप घेऊ नये, अशी तंबीही ते देत आहेत. त्यामुळे यंदा उमेदवारांच्या मुलाखती न होता उमेदवार परस्पर निश्‍चित केले जाण्याची शक्‍यता आहे. 

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात निवडणुकीसाठी मुलाखती घेण्याची पद्धत नव्हती. मात्र, उद्धव यांनी या पद्धतीत बदल करून यापूर्वीच इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. यंदा ही पद्धत बंद होण्याची शक्‍यता आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उमेदवार निश्‍चित करण्यासाठी गेल्या वेळी परीक्षा घेतल्या होत्या. यंदा त्यांनी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापाठोपाठ आता शिवसेनेतील मुलाखती रद्द होण्याची शक्‍यता आहे.

तरीही बंडखोरी अटळ 
बंडखोरी होऊ नये यासाठी उद्धव ठाकरे ही पद्धत वापरत असल्याचे बोलले जाते. तरीही बंडखोरी होणार, हे निश्‍चित आहे. कोणताही इच्छुक स्वत:चे नाव मागे घेणार नाही. त्यामुळे अंतिम निर्णय पक्षप्रमुखच घेतील. या निर्णयावर नाराज होऊन काही इच्छुक बंडखोरी करण्याची शक्‍यता काही नेते व्यक्त करत आहेत.

Web Title: shivsena democracy cancel