दादरमध्ये आजी-माजी विभागप्रमुखांमध्ये टशन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुंबई महापालिकेत तीन दशकांनंतर एकहाती सत्ता आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवसेनेच्या दादर या बालेकिल्ल्यात दुफळी माजली आहे. दादरमधील आजी-माजी विभागप्रमुख एकमेकांना भिडले आहेत. याचा फटका पक्षाला बसण्याची शक्‍यता आहे. 

मुंबई - मुंबई महापालिकेत तीन दशकांनंतर एकहाती सत्ता आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवसेनेच्या दादर या बालेकिल्ल्यात दुफळी माजली आहे. दादरमधील आजी-माजी विभागप्रमुख एकमेकांना भिडले आहेत. याचा फटका पक्षाला बसण्याची शक्‍यता आहे. 

आमदार विभागप्रमुख सदा सरवणकर आणि माजी विभागप्रमुख मिलिंद वैद्य यांच्यात विळ्या-भोपळ्याचे नाते आहे. वैद्य महापालिकेची निवडणूक लढवत असून या निवडणुकीत विजयी झाल्यास ते शिवसेनेकडून विधानसभाही लढवू शकतील. सरवणकर यांचा पत्ता कट करण्यासाठी मातोश्रीवरूनच वैद्य यांना पुढे केले जाऊ शकते. हे पुरते ओळखून असलेल्या सरवणकर यांनी वैद्य यांना शह देण्याची तयारी सुरू केली असल्याची चर्चा दादर परिसरात आहे. सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकरही प्रभादेवीतून निवडणूक रिंगणात उतरला आहे. त्यांच्याविरोधात माजी शाखाप्रमुख महेश सावंत यांनी बंडखोरी केली. महेश सावंत यांना मातोश्रीजवळील काही नेत्यांनी रसद पुरवण्यास सुरुवात केली आहे. समाधान सरवणकरचा निवडणुकीत पराभव झाल्यास त्याचा फटका सदा सरवणकर यांना बसणार हे निश्‍चितच. याच आधारावर शिवसेना विधानसभेची उमेदवारी बाद होऊ शकते. 

माहीम जिंकण्याची अपेक्षा 
1989 मध्ये युती झाल्यानंतर आता प्रथमच शिवसेना एकट्याने निवडणूक लढवत आहे. त्यांना माहीम विधानसभा क्षेत्रातील सातही प्रभाग निवडून येण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेच्या सरदारांमध्येच जुंपली आहे. 

Web Title: shivsena head fight in dadar