शिवसेनेने उन्हाळ्यात भागवली गरिबांची तहान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

उल्हासनगर : एकीकडे कडक उन्हाळा सुरू असून शरीराची लाहीलाही होत असताना थंड पाण्याअभावी गरिबांच्या घशाला कोरड पडू लागली आहे. अशा गोरगरिबांसाठी शिवसेना शाखाप्रमुख आदिनाथ पालवे यांनी थंड पाण्याचे वॉटरकुलर भेट देऊन गरिबांची तहान भागवण्यात पुढाकार घेतला आहे.

कॅम्प नंबर 3 ओटी सेक्शन मधील संतोष नगर ही बहुतांश गोरगरिबांची वसाहत असून आदिनाथ पालवे यांनी वॉटरकुलरची भेट दिल्याने आणि ऐन उन्हाळ्यात थंड पाणी पिण्यासाठी मिळणार असल्याने नागरिक सुखावून गेले आहेत.शिवसेना कल्याण उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे,शहरप्रमुख राजेंद्र चौधरी,उपशहरप्रमुख राजेंद्र साहू यांनी या वॉटरकुलरचे उदघाटन करून आदिनाथ पालवे यांचे कौतुक केले.

Web Title: Shivsena held the summer thirst for the poor