दुःखाचा डोंगर, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचं निधन

दुःखाचा डोंगर, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचं निधन

मुंबईः महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी यांचे काल रात्री निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७५ वर्षांच्या होत्या. 

मुंबईत मनोहर जोशी यांच्या दादर इथल्या घरी रात्री 11 वाजता अनघा यांचं निधन झालं. दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिमसंस्कार केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या.

१४ मे १९६४ रोजी मनोहर जोशी यांचा अनघा यांच्याबरोबर विवाह झाला होता. त्यांचं माहेरचं नाव होतं मंगल हिगवे. त्यांचा जन्म २ जानेवारी १९४५ रोजी झाला.  अनघा जोशी यांच्या पश्चात पती मनोहर जोशी, पुत्र उन्मेष जोशी, अस्मिता आणि नम्रता या दोन कन्या, जावई गिरीश व्यास असं मोठं कुटुंब आहे.

मनोहर जोशी यांच्या पाठीमागे त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांनी मनोहर यांना राजकीय आणि सामाजिक जीवनात मोलाची साथ दिली. मनोहर जोशी यांचा राजकीय प्रवास सुरू झाला तेव्हा कायम त्यांच्या मागे उभ्या असायच्या.

मनोहर जोशी यांची राजकारणातील कारकीर्द लग्नानंतरच सुरु झाली. १९६८ मध्ये ते सर्वप्रथम दादरमधून मुंबई महापालिकेत नगरसेवकपदी निवडून आले. त्यानंतर मुंबईचे महापौर, विधानपरिषद, विधानसभा आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, लोकसभा खासदार, केंद्रीय मंत्रिपद, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा अशी त्यांची राजकीय कारकीर्द उमलत गेल्या. मनोहर जोशी यांच्या बऱ्या-वाईट काळात अनघा जोशी यांनी पतीला खंबीर साथ दिल्याचे बोललं जातं. त्यांच्या निधनानं संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Shivsena leader Former Chief Minister Manohar Joshiwife Anagha passes away dadar house

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com