ट्विट करुन संजय राऊतांचा कंगना राणावतवर पुन्हा एकदा निशाणा

पूजा विचारे
Sunday, 6 September 2020

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा अभिनेत्री कंगना राणावतवर निशाणा साधला आहे. एक ट्विट करुन राऊतांनी कंगनाला इशारा दिला आहे. हे ट्विट संजय राऊत यांनी हिंदीमध्ये केलं आहे. 

मुंबईः शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा अभिनेत्री कंगना राणावतवर निशाणा साधला आहे. एक ट्विट करुन राऊतांनी कंगनाला इशारा दिला आहे. हे ट्विट संजय राऊत यांनी हिंदीमध्ये केलं आहे. 

या ट्विटमध्ये कंगनाचं नाव न घेतला संपूर्ण रोख कंगनावरच असल्याचं समजतंय. मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना, पहले भी कई तूफानों का रुख मोड चुका हूँ,' असं राऊत यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे. 

याआधी कंगनाला संजय राऊत यांनी हरामखोर मुलगी असं म्हटलं होतं. त्यानंतर या शब्दावरुन अनेकांनी आक्षेपही घेतला. राऊत यांनी अभिनेत्री माफी मागावी अशी मागणी आता होऊ लागली आहे. मात्र जर कंगनानं महाराष्ट्राची माफी मागितली तर मी तिची माफी मागण्याबद्दल विचार करेन, असं राऊत म्हणालेत. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

तसंच मुंबईबद्दल वक्तव्य करण्याची हिंमत केली तशीच हिंमत कंगनानं अहमदाबद्दल करावी, असा टोलाही राऊत यांनी कंगनाला लगावला आहे. कंगनाने तिच्या एका ट्विटमध्ये मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. तिच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून अनेकांनी तिच्यावर टीका केली. 

हेही वाचाः कंगनाच्या प्रकरणावरुन दिया मिर्झानं संजय राऊतांकडे केली 'ही' मागणी

 मी अॅक्शनवाला माणूसः राऊत 

मी कोणाचंही नाव घेणार नाही.  मी पोकळ धमक्या देत नाही, मी शिवसैनिक आहे, अ‍ॅक्शनवाला माणूस, नौटंक्या करत नाही, या काही मेंटल केस मुंबईत वाढल्या आहेत, त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी कारवाई करावी, या शब्दात संजय राऊत यांनी कंगनावर निशाणा साधला आहे.

अधिक वाचाः  संजय राऊतांनंतर 'हा' शिवसेना नेता संतापला, कंगनावर या शब्दात केली टीका

राम कदमांनी कंगनाची तुलना झाशीच्या राणीशी करणं हा सर्वात मोठा अपमान आहे. झाशीची राणी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता आहे.  झाशीची राणी ही महाराष्ट्राची वीरकन्या, महाराष्ट्राच्या अस्मितेवर ड्रग्सच्या गुळण्या करून आणि नशेच्या अंमलात कोणी स्वत:ला झाशीची राणी समजत असेल, आणि राजकीय पक्ष झाशीच्या राणीचा अपमान करणार असेल, तर राजकारण किती तळाला नेलंय हे स्पष्ट दिसतंय, असंही ते म्हणालेत.

धमकी वगैरे देण्याची मला सवय नाही, आम्ही अ‍ॅक्शन घेतो, महाराष्ट्रात कमवते, खाते, मुंबई पोलिस त्यांचं रक्षण करते आणि त्यांच्यावरच आरोप कोणी करत असेल तर आम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही का?, असा सवालही संजय राऊत उपस्थित केला.

shivsena leader sanjay raut Again attack kangana ranaut


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena leader sanjay raut Again attack kangana ranaut