esakal | "आमच्या घरासमोर ED, CBI चे कार्यालय सुरु करा, पण महाविकास आघाडीचा एकही आमदार शरण येणार नाही"
sakal

बोलून बातमी शोधा

"आमच्या घरासमोर ED, CBI चे कार्यालय सुरु करा, पण महाविकास आघाडीचा एकही आमदार शरण येणार नाही"

आमच्या घरासमोर ED, CBI चे कार्यालय सुरु करा. पण महाविकास आघाडीचा एकही आमदार शरण येणार नाही

"आमच्या घरासमोर ED, CBI चे कार्यालय सुरु करा, पण महाविकास आघाडीचा एकही आमदार शरण येणार नाही"

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई, ता.24 :अमंलबजावणी संचनालयालय (ED) हे एका पक्षाची शाखा असल्या सारखे काम करत आहेत. मी 100 जणांची यादी देतो, द्या कारवाईचे आदेश, असे थेट आव्हान देत अशा कारवायांना शिवसेनाच काय महाविकास आघाडीतील एकही आमदार शरण येणार  नाही.  असे प्रतिउत्तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे घरी नसताना त्यांच्या घरावर ईडीने छापे मारले. संध्याकाळी ते मुंबईत आल्यावर त्यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. सरनाईक यांच्या घरी धाडसत्र सुरु असताना राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ही कारवाई म्हणजे केंद्रीय संस्थांचा गैरवापर असून महाराष्ट्र आणि महाविकास आघाडीला बनदाम करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप केला.

आमच्या घरासमोर ED, CBI चे कार्यालय सुरु करा. पण महाविकास आघाडीचा एकही आमदार शरण येणार नाही असे प्रतिउत्तर राऊत यांनी दिले. ईडी एका पक्षाची शाखा असल्याचे काम करत असून अनेकांवर आरोप आहेत. मात्र, त्यांची चौकशी होत नाही. निवडणुकीसाठी पैसा कोठून येताे. तो कसा पाठवला जातो. तो कसा वापरला जातो. हे सर्व माहिती आहे. अशा 100 जणांची यादी देतो . करा कारवाई असा थेट इशाराच संजय राऊत त्यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या : 

>> "आता नको वादावादी, आता फक्त राष्ट्रवादी" म्हणत भाजपचा बडा नेता राष्ट्रवादीत ! 

>> "रावसाहेब दानवे यांना ज्योतिष शास्त्र माहिती आहे, हे आम्हाला माहित नव्हतं" - शरद पवार

>> आक्षेपार्ह ट्विटप्रकरणी कंगनाला उच्च न्यायालयाचा तूर्तास दिलासा; चौकशीस उपस्थित राहण्याचे आदेश​

>> "कुणीही पॅनिक होऊ नका"; लॉकडाऊनबाबत स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती

>> TRP घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी 12 आरोपींविरोधात दाखल केलं 1400 पानी आरोपपत्र

>>  येत्या २६ तारखेला बँकीग व्यवहार ठप्प होण्याची शक्यता, देशव्यापी संपात बँकिंग संघटनाही सहभागी होणार

( संपादन - सुमित बागुल )

shivsena leader sanjay raut on raid by ED on pratap sarnaiks home and office

loading image